ETV Bharat / entertainment

Anurag Kashyap on Kangana : अनुराग कश्यप म्हणतो कंगना रणौत 'उत्कृष्ट अभिनेत्री' असली तरी तिला सामोरं जाणं 'खूप अवघडंय' - Anurag Kashyap on Kangana

Anurag Kashyap on Kangana : निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यपने कंगना राणौतच्या अभिनय कौशल्याची तारीफ केली, पण तिला सामोरं जाणं खूप अवघड असल्याचं तो म्हणाला. अनुराग कश्यप आणि कंगना रणौत एकेकाळी चांगले मित्र होते पण कंगनाच्या कडवट देशाभिमानामुळे त्याच्या नात्यात अंतर निर्माण झालंय.

Anurag Kashyap on Kangana
अनुराग कश्यप आणि कंगना रणौत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 3:37 PM IST

मुंबई - Anurag Kashyap on Kangana : बॉलिवूडचा प्रख्यात निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यपने कंगना रणौतच्या अभिनय कौशल्याची तारीफ केली. अनुराग आणि अभिनेता झीशान अय्युब यांनी नवाजुद्दीन सिद्दीकीची मुख्य भूमिका असलेल्या 'हड्डी' या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कंगनासोबत आधी काम केल्याचा अनुभवावर भाष्य केलं. कंगना रणौतने तनु वेड्स मनु, तनु वेड्स मनु रिटर्न्स आणि मणिकर्णिका यांसारख्या चित्रपटांमध्ये झीशानसोबत एकत्र काम केलं आहे. यावेळी बोलताना झीशानने कंगनाच्या अभिनय क्षमतेचे कौतुक केलं. ती एक उत्तम अभिनेत्री असल्याचं तो म्हणाला.

यावेळी बोलताना अनुरागनेही कंगना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असल्याचं सांगितलं. काम करताना ती खूप प्रमाणिक असते, मात्र तिच्या काही वेगळ्या समस्या आहेत. परंतु तिच्या अभिनय प्रतिभेचा विचार केला तर तिची ही प्रतिभा कोणीही तिच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, असेही अनुराग म्हणाला.

अनुरागने कंगनाच्या प्रतिभेचं कौतुक केलं असलं तरी तिला सामोरं जाणं कठीण असल्याचं तो म्हणाला. 'तिच्यामध्ये अभिनय प्रतिभा आहे, ती प्रामाणिक समीक्षकही आहे, परंतु तिच्याशी सामना करणे खूप कठीण आहे,' असे अनुराग म्हणाला.

यापूर्वी 2013 मध्ये अनुराग कश्यप आणि कंगना रणौत यांनी 'क्वीन' या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाची निर्मिती विक्रमादित्य मोटवाने, मधु मंटेना आणि दिग्दर्शक विकास बहल यांच्यासमवेत अनुराग कश्यपच्या सह-मालकीच्या फॅंटम फिल्म्स या बॅनरने केली होती. मात्र, गेल्या खूप वर्षांत त्यांनी एकत्र काम केलेलं नाही. अनुरागने एकदा खुलासा केला होता की, त्याने 'साँड की आँख' चित्रपटासाठी कंगनाला संपर्क केला होता. मात्र तिने नकार दिला. त्यामुळे तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांना घेऊन हा चित्रपट पूर्ण करावा लागला.

काही काळापूर्वी अनुराग कश्यपने सोशल मीडियावर कंगनाबद्दल बोलताना सांगितले होते की, ती त्याची चांगली मैत्रीण होती. तिने त्याला चित्रपटांसाठी नेहमीच प्रेरित केलं होतं. मात्र आता ती पूर्णतः बदलली आहे. सध्याच्या कंगनाला तो ओळखत नाही. देशभक्तीबद्दलची तिची भूमिका जिंगोस्टिक वाटत असल्याचंही अनुराग कश्यप म्हणाला होता.

यानंतर कंगनानेही अनुरागच्या या कमेंटवर प्रतिक्रिया देताना ती तिच्या तत्वांशी, विचारांशी आणि तिच्या राष्ट्राशी बांधिलकी दाखवून तिच्या विश्वासांशी तडजोड करणार नाही हे स्पष्ट केलं होतं. देशाच्या सन्मानासाठी आवाज उठवत स्वाभिमानाने जगत असल्याचं कंगनानं सांगितलं होतं.

हेही वाचा -

१. Poonam Pandey: पूनम पांडेच्या घराला लागली आग ; मोलकरणीनं वाचविलं पाळीव कुत्र्याचे प्राण...

२. Rubina Dilaik : रुबीना दिलैकनं सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करताना फोटो केले शेअर...

३. Jab We Met Sequel: 'जब वी मेट' चित्रपटाचा सीक्वल लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.