ETV Bharat / entertainment

Anupam Kher Pooja : पंडितांनी केली अनुपम खेरची पूजा - Anupam kher video

अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर करून सांगितले आहे की, 'द काश्मीर फाइल्स' रिलीज झाल्यापासून काही दिवसांनी काही पंडित घरी येतात आणि पूजा करतात आणि काहीही न मागता निघून जातात.

Anupam Kher Pooja
Anupam Kher Pooja
author img

By

Published : Mar 31, 2022, 3:34 PM IST

हैदराबाद : 1 मार्च रोजी प्रदर्शित झालेला 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट अजूनही चर्चेत आहे. परदेशातही या चित्रपटाची चर्चा होत आहे. त्याचवेळी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी शेयर केलेला व्हिडीयो सोशल मिडीयावर जबरदस्त चर्चेत आहे. यात काही पंडित अनुपम खेर यांची पूजा करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये दोन पंडित मंत्रोच्चार करत आहेत आणि अनुपम खेर यांना फुलांचा हार घालताना दिसत आहेत. अनुपम खेर यांची देवासारखी पूजा केली जात आहे. या चित्रपटात अनुपम यांनी काश्मिरी पंडित पुष्करनाथ पंडित यांची भूमिका साकारली आहे. 'गेल्या काही दिवसांपासून किंवा #TheKashmirFiles रिलीज झाल्यानंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी एक पंडित किंवा पुजारी माझ्या घराखाली येतो. आणि पूजा करतो आणि काहीही न मागता निघून जातो, असेही सांगितले आहे.

200 कोटी रुपयांची केली कमाई

द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. 15 कोटीं बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 1990 साली झालेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. या चित्रपटामुळे एकीकडे काही लोक म्हणत आहेत की हे काम मुस्लिमांबद्दल द्वेष पसरवण्यासाठी केले जात आहे, तर दुसरा भाग म्हणत आहे की काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची ही कहाणी आतापर्यंत लपवून का ठेवण्यात आली आहे. ते या चित्रपटाला उघडपणे पाठिंबा देत आहेत.

हेही वाचा - Big B Watch RRR at rishikesh : अमिताभ बच्चन यांनी ऋषीकेश येथे पाहिला RRR चित्रपट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.