मुंबई - भारतातील प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योगपती रतन टाटा यांच्या कुटुंबावर हिंदी चित्रपटसृष्टीत चित्रपट बनणार आहे. टी-सीरीजने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली आहे. T-Series आणि Almighty Motion Pictures यांनी व्यवसाय जगतातील प्रामाणिक व्यक्ती असलेल्या रतन टाटा यांच्या कुटुंबावर चित्रपट बनवण्यासाठी हातमिळवणी केली आहे. आता रतन टाटा यांचे औदार्य पाहिल्यानंतर प्रेक्षकांना त्यांच्या कुटुंबीयांना जवळून जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सेशल मीडियावरुन चित्रपटाबाबत घोषणा - T-Series Films आणि Almighty Motion Pictures ने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे रतन टाटा यांच्या कुटुंबावरील चित्रपटाची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले आहे की कंपनीने या दिग्गज व्यावसायिक घराच्या कथेचे हक्क विकत घेतले आहेत. पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, या घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशाला पुढे नेण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की T-Series आणि Almighty Motion Pictures संयुक्तपणे 'द टाटा' या हॅशटॅगसह देशातील महान व्यावसायिक कुटुंबाची कथा जगासमोर सादर करणार आहेत.
चित्रपटाचे कथानक - टाटा कुटुंबाचा इतिहास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे शूटिंग कधी आणि कुठे सुरू होईल याची कोणतीही माहिती प्रॉडक्शनने दिलेली नाही. तसेच या चित्रपटाच्या स्टारकास्टबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. सोबतच हा चित्रपट बनवला जाईल की वेबसीरिज हेही सांगण्यात आलेले नाही.
या पुस्तकावर आधारित असेल चित्रपटाचे कथानक - टाटा कुटुंबाला पडद्यावर सादर करण्यासाठी, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक गिरीश कुबेर यांच्या 'द टाटास: हाऊ अ फॅमिली बिल्ड्स अ बिझनेस अँड नेशन' या पुस्तकातून कथा तयार केली जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने नुकतेच या पुस्तकाचे हक्क विकत घेतले आहेत.
हेही वाचा - Karthik Aryan Visit Varanasi : कार्तिक आर्यनने काशीत फेडले नवस, गंगा आरतीला लावली हजेरी