ETV Bharat / entertainment

Ankita Lokhande Trolled : 'बिग बॉस 17'मध्ये सुशांत सिंगबद्दल बोलताना अंकिता लोखंडे झाली भावूक - Ankita lokhande and sushant singh rajput

Ankita Lokhande Trolled :'बिग बॉस 17' शोची सध्या खूप चर्चा आहे. या शोमध्ये खूप वाद पाहायला मिळताहेत. दरम्यान अंकिता सुशांत सिंगबद्दल अभिषेकशी बोलताना भावूक होताना दिसली, त्यानंतर तिला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं, तर काहीजण तिच्या समर्थनात पुढे आले आहेत.

Ankita Lokhande Trolled
अंकिता लोखंडे ट्रोल झाली
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 11:26 AM IST

मुंबई - Ankita Lokhande Trolled : 'बिग बॉस 17'मध्ये सेलेब्समध्ये रोज नवे वाद होताना दिसताहेत. या शोमध्ये अंकिता लोखंडे अनेकदा सुशांतबद्दलच्या आठवणी सांगताना दिसते. अंकिता जेव्हाही सुशांतबद्दल बोलते, तेव्हा ती भावूक होते. दरम्यान, सुशांत सिंग राजपूतबद्दल अभिषेक कुमारशी बोलताना अंकिता भावूक झाली. त्यानंतर अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं. मात्र काहीजण आता तिच्या समर्थनात पुढे आले आहेत. अंकिता या शोमध्ये अभिषेकशी सुशांतबद्दल बोलताना म्हणते की, 'जेव्हा तू शर्टशिवाय घरात फिरतो, तेव्हा तू मला सुशांतची आठवण करून देतो'. त्यानंतर यावर अभिषेक सांगतो की, 'माझा आणि सुशांतचा प्रवास सारखाच आहे. आम्ही दोघेही लहान शहरातील आहोत'. त्यानंतर अंकिता म्हणते की, 'सुशांत अजिबात आक्रमक नव्हता. तो खूप शांत होता'.

अंकिता भावूक झाली : सुशांतबद्दल बोलताना अंकिताच्या डोळ्यात पाणी आलं. ती सांगते की 'तो नेहमी सर्वांशी चांगला वागला आणि प्रत्येकाला तो मदत करत होता, त्यानंतर अचानक तो दुःखी झाला'. सुशांतचं कौतुक करताना अंकितानं म्हटलं, 'तो खूप मेहनती होता.' त्यानंतर ती भावूक झाल्याचं पाहून अभिषेक म्हणतो की, 'त्याला वाटले की तो कधीच तिच्याशी सुशांतबद्दल बोलणार नाही'. यावर अंकिता म्हणते की, 'तिला सुशांतबद्दल बोलायला आवडते.' अंकिता आणि अभिषेकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली. काहीजणांनी तिला नाटक करत असल्याचं म्हटलंय.

सुशांतच्या चाहत्यांनी केले ट्रोल : अंकिता सुशांतसाठी भावूक होत असल्याचं पाहून सुशांतच्या एका चाहत्यांनी म्हटलं, 'सुशांतचे नाव घेऊन ती सहानुभूती घेत आहे'. त्यानंतर दुसऱ्यानं म्हटलं, 'हा शो जिंकण्यासाठी ती सुशांतचं नाव घेत आहे'. एका चाहत्यानं अंकिताच्या समर्थनार्थ लिहलं, 'अंकिताला त्याच्याबद्दल बोलणे चांगले वाटते, मला याबद्दल चांगल वाटत आहे. सुशांतचे अनेक चाहते तिला ट्रोल करत आहेत पण त्यांच प्रेम कोणीचं समजून घेतल नाही'. दुसऱ्या एका चाहत्यानं लिहलं, 'बिग बॉस 17 मध्ये अंकिता सुशांतबद्दल बोलत आहे. ती अजूनही त्याच्यावर प्रेम करते, त्याच्याबद्दल बोलताना ती रडते.' अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.

हेही वाचा :

  1. Honey Singh Divorce : हनी सिंगचा १२ वर्ष जुना संसार तुटला, पत्नी शालिनी तलवारशी घटस्फोट
  2. Katrina Kaif : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नानंतर कतरिना कैफ 'मॉर्फ'च्या जाळ्यात
  3. Don 3 Update : रणवीर सिंगसोबत 'डॉन 3'मध्ये जंगली बिल्लीचीही होणार एंट्री ?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.