ETV Bharat / entertainment

'अ‍ॅनिमल'च्या प्रोमानं बुर्ज खलिफा उजळला, रणबीर कपूरनं बॉबी देओलसह दिली भेट - रणबीर कपूर स्टारर अ‍ॅनिमल

अभिनेता रणबीर कपूर, बॉबी देओल आणि निर्माता भूषण कुमार 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईत पोहोचले आहेत. या चित्रपटाचा 60 सेकंदांचा खास कट केलेला प्रोमो जगातील सर्वात उंच इमारती बुर्ज खलिफावर शुक्रवारी रात्री प्ले करण्यात आला.

Animal prmotion on Burj Khalifa
'अ‍ॅनिमल'च्या प्रोमानं बुर्ज खलिफा उजळला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 5:33 PM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्या भूमिका असलेल्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाची प्रतीक्षा गेली वर्षभर सुरू आहे. अखेर हा चित्रपट प्रकदर्शनासाठी सज्ज झालाय. जसजशी रिलीज डेट जवळ येत आहे तसतसे निर्माते आणि कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जीवाचं रान करताहेत. दुबईच्या बुर्ज खलिफा येथे चित्रपटाचा ६० सेकंदाचा स्निपेट दाखवला जाणार असल्याची बातमी अलीकडेच प्रसिद्ध झाली होती. अखेर याचीही प्रतीक्षा शुक्रवारी संपली आणि 'अ‍ॅनिमल'चा विशेष कट केलेला ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकला. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

शनिवारी पहाटे बॉबी देओलनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ टाकला ज्यामध्ये रणबीर कपूर आणि भूषण कुमार दिसत असून ते दुबईतील प्रतिष्ठित बुर्ज खलिफाच्या दर्शनी भागावर प्रकाश टाकणारा 'अ‍ॅनिमल' विशेष प्रोमो पाहत आहेत. व्हिज्युअल शेअर करताना बॉबी देओलने लिहिले, "अ‍ॅनिमल इन दुबई"

Animal prmotion on Burj Khalifa
'अ‍ॅनिमल'च्या प्रोमानं बुर्ज खलिफा उजळला

यानंतर बॉबी देओलने रणबीर कपूर, भूषण कुमार आणि टीमसोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे. यामध्ये रणबीर पँट आणि तपकिरी शूजशी मॅचिंग असलेल्या काळ्या फुल-स्लीव्ह झिप-अप जॅकेटमध्ये डॅपर दिसत आहे. दरम्यान, बॉबी देओल राखाडी पँट आणि पांढऱ्या स्नीकर्ससह पांढरा टी-शर्ट घतलेला दिसतोय.

Animal prmotion on Burj Khalifa
'अ‍ॅनिमल'च्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर, बॉबी देओल आणि भूषण कुमार दुबंईत

'अ‍ॅनिमल'चा टीझर सप्टेंबरमध्ये रणबीर कपूरच्या वाढदिवशी रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर या आगामी क्राईम थ्रिलरबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. चित्तथरारक कथानक असलेली अशांत पिता-पुत्राच्या नात्याच्या गुंतागुंतीची ही गोष्ट प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी वाटली होती. या चित्रपटात अनिल कपूरने रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे, तर बॉबी देओलने खलनायकाची तडफदार भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदान्ना यामध्ये रणबीरच्या पत्नी गीतांजलीची भूमिका साकारत आहे.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाला भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी सिरीज, मुराद खेतानीच्या सिने स्टुडिओज आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली प्रॉडक्शनचं समर्थन आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हेही वाचा -

  1. 'टायगर 3'च्या सक्सेस पार्टीत भाईजाननं विकी कौशलवर भाष्य करताच लाजली कतरिना

2. कंगना राणौतनं चेन्नईत सुरू केलं सायकॉलॉजिकल थ्रिलरचं शूटिंग, आर माधवनसोबत होणार पुनर्मिलन

3. अभिजीत सावंतमुळं पक्षपात झाला, उपविजेत्या अमित सानाची इंडियन आयडॉलवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.