ETV Bharat / entertainment

Animal movie poster : 'अ‍ॅनिमल' चित्रपटामधील बॉबी देओलचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज... - रणबीर कपूर

Animal movie poster : रणबीर कपूरच्या आगामी 'अ‍ॅनिमल' चित्रपटामधील बॉबी देओलचं फर्स्ट लूक पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. 'अ‍ॅनिमल'मधील हे पोस्टर पाहून चाहते या चित्रपटासाठी खूप आतुर झाले आहेत.

Animal movie poster
अ‍ॅनिमल चित्रपटामधील पोस्टर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 2:02 PM IST

Updated : Sep 26, 2023, 4:22 PM IST

मुंबई - Animal movie poster : रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' हा 2023 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. दरम्यान आता निर्मात्यांनी या चित्रपटामधील काही खास पोस्टर शेअर करण्यास सुरुवात केली आहेत. चित्रपटामधील रणबीरचा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये खूप उत्साह निर्माण झाला होता. दरम्यान आता या चित्रपटामधील बॉबी देओलचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये बॉबी हा खलनायक साकारणार आहे. 'अ‍ॅनिमल' या चित्रपटामधील पोस्टरमध्ये बॉबी हा निर्दयी आणि कठोर दिसत आहे. या पोस्टरमध्ये त्याचा चेहरा रक्ताने माखलेला आहे.

फर्स्ट लूक पोस्टर : यापूर्वी रश्मिका मंदाना, रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला होता. 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये अनिल कपूर रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. अनिलच्या व्यक्तिरेखेचं नाव बलवीर आहे. 'अ‍ॅनिमल' हा एक संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित गँगस्टर ड्रामा चित्रपट आहे. यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी रश्मिका मंदान्नाचं फर्स्ट लूक शेअर केले होते. रश्मिका ही फर्स्ट लूकमध्ये पारंपरिक पोशाखात दिसली होती. तिनं कॉन्ट्रास्टिंग मरून आणि क्रीम कलरची साडी नेसली होती. या लूकमध्ये तिच्या गळ्यात मंगळसूत्रही दिसत होतं. रश्मिकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला.

रश्मिका ही पहिल्यांदा रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करेल : 'अ‍ॅनिमल' चित्रपटात रश्मिकाच्या पात्राचं नाव गीतांजली आहे. या चित्रपटामध्ये रश्मिका ही पहिल्यांदाच रणबीर कपूरबरोबर दिसणार आहे. 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट यापूर्वी 11 ऑगस्टला 'गदर' 2 आणि 'OMG 2' सोबत प्रदर्शित होणार होता. पण निर्मात्यांनी रिलीजची तारीख बदलून 1 डिसेंबर 2023 केली आहे. रणबीरला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. यापूर्वी त्याचा 'तू झूठी मैं मक्कार' हा चित्रपट श्रद्धा कपूरबरोबर आला होता. रणबीरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप हिट ठरला होता. याशिवाय तो 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Chunky pandey birthday : अनन्या पांडेनं 'हे' फोटो आणि व्हिडिओ शेअर करून वडील चंकी पांडेला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...
  2. Dev Anand 100th birth anniversary: सदाबहार नायक आणि स्टाईल आयकॉन देव आनंदच्या आठवणी
  3. Jogeshwaris Pati Bhairavanath : 'जोगेश्वरीचा पती भैरवनाथ' मालिकेत रंगणार जोगेश्वरी आणि भैरवनाथाचा विवाहसोहळा

Last Updated : Sep 26, 2023, 4:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.