ETV Bharat / entertainment

रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल'ची बॉक्स ऑफिसवर 12 व्या दिवशीही घोडदौड सुरूच - रणबीर कपूर

Animal Box Office Collection Day 12 : अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'अ‍ॅनिमल' बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. दरम्यान, हा चित्रपट रिलीजच्या बाराव्या दिवशी किती कमाई करेल हे जाणून घेऊया.

Animal Box Office Collection Day 12
अ‍ॅनिमल बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १२
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2023, 3:16 PM IST

मुंबई - Animal Box Office Collection Day 12 : संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 2023 मधील अ‍ॅक्शन ड्रामा 'अ‍ॅनिमल' बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून अनेक चित्रपटांचे विक्रमही मोडीत काढत आहे. या चित्रपटानं दुसऱ्या वीकेंडला इतिहास रचला आणि दुसऱ्या रविवारी 'अ‍ॅनिमल'नं आमिर खानच्या 'दंगल'चाही विक्रम मोडीत काढला आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या 12व्या दिवसात आहे. याशिवाय रणबीर कपूरच्या चित्रपटानं रिलीजच्या 11व्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला हे जाणून घेऊया.

'अ‍ॅनिमल'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : रिलीजच्या 12व्या दिवशीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'अ‍ॅनिमल'नं रिलीजच्या 11व्या दिवशी देशांतर्गत 13.85 कोटीची कमाई केली आहे. यासह 'अ‍ॅनिमल'चं बॉक्स ऑफिस एकूण कलेक्शन 445.12 कोटीवर पोहोचलं आहे. हा चित्रपट लवकरच देशांतर्गत 500 कोटीची कमाई करेल. याशिवाय 'अ‍ॅनिमल'नं जगभरात 737.98 कोटीची कमाई केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' ही टी-सिरीज आणि भद्रकाली पिक्चर्सची निर्मिती आहे. 'अ‍ॅनिमल'मध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'अ‍ॅनिमल' 2023चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. 'अ‍ॅनिमल' खूप झपाट्यानं कमाई करत आहे.

'अ‍ॅनिमल'चं बॉक्स ऑफिस एकूण कलेक्शन

शुक्रवार पहिला दिवस 63.8 कोटी

शनिवार दुसरा दिवस ६६.२७ कोटी

रविवार तिसरा दिवस 71.46 कोटी

पहिला सोमवार चौथा दिवस 43.96 कोटी

पहिला मंगळवार पाचवा दिवस 37.47 कोटी

पहिला बुधवार सहावा दिवस 30.39 कोटी

पहिला गुरुवार सात दिवस 24.23 कोटी

पहिला आठवडा एकूण कलेक्शन 337.58 कोटी

दुसरा शुक्रवार आठवा दिवस 22.95 कोटी

दुसरा शनिवार नव्वा दिवस 34.74 कोटी

दुसरा रविवार दहावा दिवस 36 कोटी

तिसरा सोमवार अकरा दिवस 13.85 कोटी

दुसरा मंगळवार बारावा दिवस 3.37 कोटी कमाई करू शकतो.

एकूण 448.49 कोटी

हेही वाचा :

  1. करण सिंग ग्रोव्हरचं 'फायटर'मधील फर्स्ट लूक पोस्टर दीपिका पदुकोणनं केलं शेअर
  2. 'जमाल कुडू' गाण्याची स्टेप्स कशी सूचली याचा बॉबी देओलनं केला खुलासा
  3. 'पठाण' आणि 'जवान'च्या यशानंतर 'डंकी' रिलीज होण्यापूर्वी किंग खाननं घेतलं वैष्णोदेवीचं दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.