मुंबई - Animal Movie : रणबीर कपूरचा 'अॅनिमल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. 'अॅनिमल' या चित्रपटानं पहिल्याच दिवशी देशांतर्गत 61 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'अॅनिमल'नं पहिल्या दिवशी 'पठान' चित्रपटाच्या ओपनिंग कमाईपेक्षा जास्त गल्ला जमवला. बॉक्स ऑफिस कमाईमध्ये 'टायगर 3', 'गदर 2' आणि साऊथ सुपरस्टार रजनीकांतच्या 'जेलर'लाही 'अॅनिमल'नं मागे टाकले. रणबीरचे टॉप 5 ओपनिंग करणार चित्रपट देखील आता मागे पडले आहेत. रणबीरच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग करणार हा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, परिणीती चोप्रा, तृप्ती दिमरी, अनिल कपूर शक्ती कपूर आणि इतर कलाकार आहेत. 'अॅनिमल'नं जगभरात 116 कोटीची कमाई केली आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर लवकरच 100 कोटीचं लक्ष गाठेल असं सध्या दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अॅनिमल या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले
संजू चित्रपट
देशांतर्गत ओपनिंग - 34.75 कोटी
देशांतर्गत एकूण कलेक्शन 342.53 कोटी
जगभरात कलेक्शन - 586 कोटी
चित्रपटाचं बजेट - 96 कोटी
संजू 2018मध्ये प्रदर्शित झाला.
ब्रह्मास्त्र चित्रपट
देशांतर्गत ओपनिंग 36 कोटी
जगभरात ओपनिंग कलेक्शन 75 कोटी
देशांतर्गत एकूण कलेक्शन – 256 कोटी
जगभरात एकूण कलेक्शन 431 कोटी
चित्रपटाचं बजेट - 410 कोटी
ब्रह्मास्त्र चित्रपट 2022मध्ये प्रदर्शित झाला.
ये जवानी है दिवानी चित्रपट
देशांतर्गत ओपनिंग 19.45 कोटी
देशांतर्गत एकूण कलेक्शन 188.57 कोटी
जगभरात एकूण कलेक्शन– 319.6 कोटी
चित्रपटाचं बजेट - 40 कोटी
ये जवानी है दिवानी 20132मध्ये प्रदर्शित झाला.
तू झूठी मैं मक्कार चित्रपट
देशांतर्गत ओपनिंग - 18 कोटी
जगभरात ओपनिंग कलेक्शन - 21.06 कोटी
देशांतर्गत एकूण कलेक्शन - 149.05 कोटी
जगभरातील एकूण कलेक्शन 220 कोटी
चित्रपटाचं बजेट - 200 कोटी
तू झूठी मैं मक्कार चित्रपट 2023मध्ये प्रदर्शित झाला आहे.
'ऐ दिल है मुश्किल' चित्रपट
देशांतर्गत ओपनिंग – 13.30 कोटी
देशांतर्गत एकूण कलेक्शन– 112.48 कोटी
जगभरातील एकूण कलेक्शन - 239.67 कोटी
चित्रपटाचं बजेट - 50 कोटी
ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट 2016मध्ये प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा :