मुंबई - अनिल कपूर आणि वरुण धवन 'कॉफी विथ करण'च्या नवीन भागामध्ये एकत्र दिसणार आहेत. हा एपिसोड येत्या गुरुवारी प्रदर्शित होणार आहे. या जोडीची उपस्थिती निश्चितच शोच्या चाहत्यांमध्ये आकर्षण ठरणार आहे. करण जोहरने सोमवारी आगामी भागाचा प्रोमो जारी केला आणि व्हिडिओमध्ये अनिल कपूरने कबूल केले की सेक्समुळे तो तरुण वाटतो! ‘डान्स कर के थक गया!’ असं म्हणण्याआधीच अनिल कपूरने हे विधान केले.
कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्यामुळे तो तरुण वाटतो असा प्रश्न करणने अनिल कपूरला विचारला होता. याला उत्तर देताना तो म्हणला, "सेक्स सेक्स सेक्स." काही क्षणांनंतर अनिल कपूर म्हणाला, "हे सर्व स्क्रिप्टेड आहे!" दुसरीकडे, करणने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर वरुण धवनने अर्जुन कपूर देत असल्याची धमाल प्रोमोमध्ये दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नंतर करणने वरुणला कॅटरिना कैफ किंवा दीपिका पदुकोणसोबत काम करायचे आहे का असे विचारले आणि वरुण म्हणाला, "मला नेहमी सांगितले जाते की मी लहान मुलासारखा दिसतो!" तेव्हा करणने त्याला उलट प्रश्न विचारला, "तुला वाटते की त्या तुझ्यापेक्षा मोठ्या दिसतात?" त्यानंतर वरुणने पटकन आपल्या विधानाचा बचाव केला आणि म्हणाला, "मला सांगण्यात आले आहे की मी तरुण दिसतो..."
मात्र, करणने विधान मागे घेण्यास नकार दिला आणि म्हणाला, "म्हणजे त्या तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या दिसतात." त्यानंतर वरुणची बोलती बंद झाली. यानंतर दोन्ही पाव्हण्यांनी डान्स केल्या यावेळी "डान्स करके थक गया यार!" अशी कमेंट अनिल कपूरने केली. एपिसोड, वर नमूद केल्याप्रमाणे, डिस्ने + हॉटस्टार वर या गुरुवारी प्रदर्शित होईल.
हेही वाचा - ब्रम्हास्त्रची कमाई खोटी असल्याचा कंगना रणौतचा दावा