ETV Bharat / entertainment

अ‍ॅनिमलच्या बापाचा 'अ‍ॅनिमल'च्या शत्रूसोबत फोटो, अनिल कपूरनं दिलं मजेशीर कॅप्शन - रणबीर कपूरच्या वडिलाची भूमिका अनिल कपूर

Animal Ka Enemy Bobby Deol : अनिल कपूरनं त्याच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील सहकलाकार बॉबी देओलसोबतचा एक आठवणीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोसाठी त्यानं दिलेल्या कॅप्शनकडे सर्वांचंच लक्ष वेधलं गेलंय. अनेकांनी त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Animal Ka Enemy Bobby Deol
अ‍ॅनिमल'च्या बापचा 'अ‍ॅनिमल'च्या शत्रूसोबत फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 2:41 PM IST

Updated : Nov 29, 2023, 4:58 PM IST

मुंबई - Animal Ka Enemy Bobby Deol : अभिनेता अनिल कपूरने मंगळवारी 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा सहकलाकार बॉबी देओलसोबत एक थ्रोबॅक फोटो शेअर करुन चाहत्यांना ट्रीट दिली आहे. अनिलनं 'अ‍ॅनिमल का बाप अँड अ‍ॅनिमल का एनिमी पोजींग' असं कॅप्शन या फोटोला दिलंय. फोटोत अनिल आणि बॉबी आपले शरीर सौष्ठव दाखवत आहेत.

अनिल कपूरनं हा फोटो अपलोड करताच त्याच्या चाहत्यांनी आणि फॉलोअर्सनी कमेंट सेक्शनमध्ये भरपूर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. बॉबी देओलनंही या पोस्टवर रेड हार्ट इमोजी टाकला आहे. दोघेही हॉट दिसत असल्याचं एका चाहत्यांनं म्हटलंय. अनेकांना हा फोटो आवडलाय तर याच्या कॅप्शनलाही लोक दाद देताना दिसताहेत.

'अ‍ॅनिमल' चित्रपटात रणबीर कपूरच्या वडिलाची भूमिका अनिल कपूरनं साकारली आहे. प्रत्येक माणसामध्ये आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठीची एक अंतःप्रेरणा असते. प्राणी कधीही अविचारानं वागत नाहीत. यामुळेच रणबीर साकारत असलेलेल्या पात्रावरुन चित्रपटाचं शीर्षक ठेवल्याचं एका ठिकाणी रणबीर कपूरनं सांगितलं होतं. त्यानुसार अनिल कपूर हा 'अ‍ॅनिमल'चा बाप आहे आणि बॉबी देओल यामध्ये खलनायक असल्यामुळे तो 'अ‍ॅनिमल' चा शत्रू आहे. या दोघांचा एकमेकांसोबतचा फोटो व त्याला दिलेलं कॅप्शन म्हणून चाहत्यांना आवडलं आहे.

दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी यांनी चित्रपटाचं नाव 'अ‍ॅनिमल' का ठेवलंय याचा खुलासा करताना रणबीर कपूर म्हणाला होता, "संदीप रेड्डी वंगा या चित्रपटाला 'अ‍ॅनिमल' असं शीर्षक दिलंय याचं कारण म्हणजे प्राणी अंतःप्रेरणेने वागतात. ते विचारांच्या बाहेर वावरत नाहीत. म्हणूनच मी साकारत असलेले हे पात्र त्याच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी अंतःप्रेरणेने वागते. तो अंतःप्रेरणेने वागतो आहे असे त्याला वाटत नाही; तो आवेगपूर्ण आहे, आणि मला वाटते की 'अ‍ॅनिमल' हे शीर्षक तिथूनच आलं आहे आणि एकदा तुम्ही पहा हा चित्रपट या शीर्षकाला साजेसा आहे हे चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल."

सोमवारी रणबीर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूर यांच्यासह 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची टीम हैदराबादला दाखल झाली होती. इथे पार पडलेल्या प्री रिलीज इव्हेन्टमध्ये साऊथ स्टार महेश बाबू, दिग्दर्शक एस एस राजामौली कलाकारांसोबत सामील झाले होते. 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले असून यात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा -

  1. रणबीर कपूरची पत्नी म्हटल्यानंतर आलिया भट्टचे चाहते पापाराझीवर भडकले

2. उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना वाचवल्याबद्दल सेलिब्रिटींनी बचाव पथकाचे मानले आभार

3. बिग बॉसचं घर पुन्हा बनलं रणांगण, एकमेकांना खाली खेचण्यात स्पर्धक गर्क

Last Updated : Nov 29, 2023, 4:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.