ETV Bharat / entertainment

Anil Kapoor: मिस्टर इंडियाचा दुसरा भाग येणार? अनिल कपूरची पोस्ट झाली व्हायरल... - Anil Kapoor

Anil Kapoor: अनिल कपूरनं इंस्टाग्रामवरून गायब होऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याचे खाते हॅक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अनेक लोक याला त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचा मार्गही म्हणत आहेत. तो त्याच्या 'मिस्टर इंडिया' या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वेल घेऊन येत असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.

Anil Kapoor
अनिल कपूर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 12:43 PM IST

मुंबई - Anil Kapoor: अनिल कपूर हा बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यानं आपल्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. अनिल कपूरची फॅन फॉलोइंगही मोठी आहे. सध्या अनिल कपूरनं त्याच्या इन्स्टा पोस्ट अचानक हटवून सर्वांनाचं आश्चर्यचकित केले. त्यानं 'मिस्टर इंडिया 2' च्या घोषणेसाठी असं केलं असावं असा अंदाज लावण्यात आला होता. 'मिस्टर इंडिया'मधील त्याच्या पात्राप्रमाणे तो सोशल मीडियावर 'अदृश्य' झाला आहे. याशिवाय यानंतर अनिल कपूरचा भाऊ बोनी कपूर यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल कपूरचे इंस्टाग्राम पोस्ट : अनिल कपूरनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यानं एक पोस्टही लिहिली आहे, वेळ कधीही स्थिर राहत नाही. आपल्या जीवनातून चढ-उतार, देखावे नाहीसे झाले आहे... मिस्टर इंडिया ही एक अशी गोष्ट आहे, जी वेळ देखील पुसून टाकू शकत नाही. आता, 38 वर्षांनंतर, मिस्टर इंडिया पुन्हा एकदा परत आले आहे!' सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या जाहिरातीत अनिल कपूर हा 'मिस्टर इंडिया'च्या अवतारात दिसत आहे. तो अदृश्य होतो आणि क्षणातचं पुन्हा प्रकट होतो.

अनिल कपूर बनला पुन्हा एकदा मिस्टर इंडिया: अरुण वर्माच्या भूमिकेत असलेला अनिल हा जुगलसोबत दिसत आहे. हे दोघेही एका झपाटलेल्या हवेलीत आहेत, जिथे जुगल चुकून पॉट खाली पाडतो. त्यानंतर अनिल कपूर, मिस्टर इंडियाच्या रुपात त्या पॉटला खाली आदळण्याापासून वाचवितो. तो 'मिस्टर इंडिया'च्या अवतारात अदृश्य असतो. त्यानंतर पुन्हा प्रकट होतो. या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. अनिल कपूरचा हा अवतार त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या पोस्टवर कमेंट करत बोनी कपूर यांनी 'मिस्टर इंडिया 2'ची हिंट दिली आहे. यासह नील नितीन मुकेश म्हटलं की, 'मिस्टर इंडिया 2 बनवा' याशिवाय अनेक चाहते अनिल कपूरचे कौतुक करत आहेत.

अनिल कपूर वर्क फ्रंट : अनिल कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो लवकरच रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप वंगा रेड्डी यांनी केले आहे. नुकताच अ‍ॅनिमल'चा टीझर रिलीज झाला. यामध्ये अनिल कपूर हा रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याशिवाय अनिल कपूर सिद्धार्थ आनंदच्या हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फाइटर' या चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Mandali Censor Board : ट्रेलर मंजूर करण्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल 'मंडली' निर्मात्यांकडून सेन्सॉर बोर्डावर टीका
  2. Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'मध्ये सलमान खानसोबत दिसणार टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन..
  3. Post written by Swara Bhaskar : 'ती गाझामध्ये जन्मली असती तर..', मुलीसाठी स्वरा भास्करनं लिहिलं पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.