ETV Bharat / entertainment

Ishaan Ananya Break Up : ईशान खट्टर अनन्या पांडेचे झाले ब्रेकअप

author img

By

Published : Apr 5, 2022, 4:13 PM IST

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा धाकटा भाऊ इशान खट्टर आणि अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेंनी 'खाली पीली' (Khali Peeli) या चित्रपटात एकत्र काम केले होते. हे अलीकडेच शाहिद कपूरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये ईशान आणि अनन्या एकत्र दिसले होते.

Ishaan Ananya Break Up
Ishaan Ananya Break Up

हैदराबाद : ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांच्या ब्रेकअपच्या ( Ishaan Ananya Break Up ) बातम्या सोशल मीडियावर जोर धरत आहेत. इशान आणि अनन्या वेगळे झाल्याची सगळीकडे चर्चा आहे. या दोघांनी तीन वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही. तसेच दोघांनीही त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा धाकटा भाऊ इशान खट्टर आणि अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेंनी 'खाली पीली' या चित्रपटात एकत्र काम केले होते. हे अलीकडेच शाहिद कपूरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये ईशान आणि अनन्या एकत्र दिसले होते.

जान्हवीसोबत जोडले नाव

यापूर्वी ईशान खट्टरचे नाव जान्हवी कपूरसोबतही जोडले गेले होते. 'धडक' चित्रपटात ईशान आणि जान्हवी एकत्र दिसले होते. तेव्हा त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते. याचवेळेस 'खाली-पीली' चित्रपटाच्या सेटवर ईशान-अनन्याच्या अफेअरच्या बातम्यांनी जोर धरला होता. सध्या दोघेही आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत. नुकताच अनन्याचा 'गेहरियां' चित्रपट रिलीज झाला होता. इशान 'डोंट लुक अप' या चित्रपटात कॅमिओ रोलमध्ये दिसला होता. इशानचा पुढील चित्रपट फोन भूत असून यात तो कतरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे.

हेही वाचा - Malaika Arora Car Accident : मलायकाच्या डोक्याला पडले टाके; अपघातातून सुखरूप बचावली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.