ETV Bharat / entertainment

Anand Mahindra And Shah Rukh Khan : 'किंग खान आहे १० पट 'जिंदा', 'बंदा' हो तो ऐसा', आनंद महिंद्रांची मिश्कील कमेंट - ट्वीट केले

महिंद्रा अँड महिंद्रा ग्रूपचे अध्यक्ष आनंद महिंद्राने 'जवान' चित्रपटामधील शाहरूख खानच्या 'जिंदा बंदा' गाण्याच्या संदर्भात एक ट्वीट केले आहे. आनंद महिंद्रांचे हे ट्विट खूप व्हायरल झाले आहे. दरम्यान आता या ट्विटला किंग खानने रिप्लाय दिला आहे.

Anand Mahindra And  Shah Rukh Khan
आनंद महिंद्रा आणि शाहरुख खान
author img

By

Published : Aug 3, 2023, 5:45 PM IST

मुंबई : शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. प्रीव्ह्यू पाहिल्यापासूनच चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या कहानीबद्दल उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावर 'जवान' चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज करण्यात आले आणि हे गाणे बिझनेस मॅन आनंद महिंद्रा यांनी पाहिले जे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा असे एक ट्विट केली की, सर्वांच्या नजरा आता त्यांच्यावर गेल्या आहेत. आनंद महिंद्रा यांचे ट्विट सध्या खूप व्हायरल होत आहे.

आनंद महिंद्रा यांना शाहरुखचा 'जिंदा बंदा' अवतार आवडला : आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, 'हा नायक ५७ वर्षांचा आहे? वरवर पाहता त्याच्या वृद्धत्वाची प्रक्रिया गुरुत्वाकर्षणाच्या शक्तींना विरोध करते! तो बहुतेक लोकांपेक्षा १० पट जास्त जिवंत आहे. जिंदा बंदा हो तो ऐसा...' आनंद महिंद्रा यांची प्रशंसा करण्याची ही शैली लोकांना खूप आवडली आहे. शाहरुख खान देखील हे ट्विट वाचल्यानंतर प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही आणि त्याने रिट्विट करून आपल्या मनातील विचार शेअर केले.

  • @anandmahindra Life is so short and fast sir, just trying to keep up with it. Try and entertain as many whatever it takes….laugh..cry…shake…or fly…hopefully make some to swim with the stars….dream for a few moments of joy. https://t.co/3bP8Xth1yG

    — Shah Rukh Khan (@iamsrk) August 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शाहरुखची प्रतिक्रिया काहीशी अशी होती : शाहरुख खानने रिट्विटमध्ये लिहिले की, 'आयुष्य खूप लहान आणि वेगवान आहे सर, फक्त ते चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. जास्तीत जास्त लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करा...हसा, रडा...किंवा उडा...आशा आहे की काही जण तार्‍यांसह तरंगतील...काही आनंदाच्या क्षणांची स्वप्ने पहा.' शाहरुखच्या या प्रतिक्रियेनंतर हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे : शाहरुख खानचे 'जिंदा बंदा' हे गाणे आता हिंदी (जिंदा बंदा), तमिळ (वंदा आदम) आणि तेलुगू (धुम्मे धुलिपेला) मधील सर्व प्रमुख संगीत प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. 'जवान' ही रेड चिलीज एंटरटेनमेंटची निर्मिती आहे, ज्याचे दिग्दर्शन अ‍ॅटली, गौरी खान निर्मित आणि गौरव वर्मा सह-निर्माते आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

हेही वाचा :

  1. 8 films sold out on ott platform : प्रचंड पैसे देऊन ओटीटीने हक्क घेतलेले ८ चित्रपट
  2. Chrisann Pereira : अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अडकलेली क्रिसन परेराची निर्दोष सुटका...
  3. Superman of Malegaon : 'सुपरमॅन ऑफ मालेगांव'मध्ये झळकणार आदर्श गौरव, रीमा कागतींची महत्त्वकांक्षी निर्मिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.