मुंबई - Big B Kalki 2898 AD first look: 'कल्की 2898 एडी' मधील अमिताभ बच्चनचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज 'कल्की 2898 एडी' या आगामी साय-फाय चित्रपटाच्या निर्मात्यांनी अमिताभ बच्चन यांचे फर्स्ट लूक पोस्टर त्यांच्या वाढदिवसानिमित्य प्रदर्शित केलं आहे. नाग अश्विन दिग्दर्शित या मेगा-बजेट चित्रपटात प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
'तुमच्यासोबतीनं प्रवास करणं आणि तुमच्या महानतेचे साक्षीदार होणं ही एक सन्मानाची गोष्ट आहे. अमिताभ बच्चन सर, टीम 'कल्की 2898 एडी'कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा', असे कॅप्शन निर्मात्यांनी पोस्टर शेअर करताना लिहिलंय. चित्रपटाच्या प्रमोशनमधील अमिताभचा चेहरा या पोस्टरवर पहिल्यांदाच उघड करण्यात आलाय.
बिग बींना यांना 81 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रभास देखील कल्की टीममध्ये सहभागी झाला. प्रभासनं इंस्टाग्राम स्टोरीजवर कल्कीमधील बिग बीचा पहिला लूक शेअर केला आणि बिग बींना शुभेच्छा दिल्या. 'अनेक पिढ्यांना प्रेरणा देणार्या महान व्यक्तीसोबत काम करताना धन्य झालो. एक मोठं स्वप्नं पूर्ण झालंय. वाढदिवसाच्या शुभेच्छा सर!', असं प्रभासनं लिहिलंय.
'कल्की 2898 एडी' चित्रपटाची निर्मिती वैजयंती मूव्हीज या बॅनरखाली होत आहे. या पूर्वी या बॅनरच्या वतीनं 'सीता रामम' आणि 'महानटी' सारख्या प्रशंसित चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार या बॅनरनं दिग्दर्शक नाग अश्विनचं स्वप्न पडद्यावर आणण्यासाठी तब्बल 600 कोटींच्या बजेटला हिरवा कंदिल दाखवला आहे.
या चित्रपटाची कथा 29898 एडीच्या पार्श्वभूमीवर सेट करण्यात आली आहे. उत्तम वेगवान कथानकासह भविष्यात घडू शकणाऱ्या अनेक घटनांचा वेध यात घेण्यात आलाय. नेत्रसुखद, तल्लिन करणारा सिनेमॅटिक अनुभव देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे. या चित्रपटाची पहिली झलक सॅन दियगो कॉमिक कॉन (SDCC) मध्ये जुलैमध्ये प्रदर्शित झाली होती. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाच्या टीझरनं प्रभासच्या चाहत्यांना वेड लावलं होतं. यातील प्रभासची आक्रमक भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. शिवाय आंतरराष्ट्रीय माफिया टोळीशी त्याचा होत असलेला सामना त्याला जागतिक दर्जा प्राप्त करुन देईल, अशी खात्रीही चाहत्यांना वाटली होती.
हेही वाचा -
2. Amitabh Bachchan Upcoming Movies : 'या' आगामी चित्रपटात दिसणार 'बिग बी'चा जलवा...
3. Amitabh Bachan Birthday : बिग बी: जादूगार ‘शहेनशाह’चं करिष्माई आकर्षण