ETV Bharat / entertainment

Amitabh Bachchan Upcoming Movies : 'या' आगामी चित्रपटात दिसणार 'बिग बी'चा जलवा... - गणपथ

Amitabh Bachchan Upcoming Movies : अमिताभ बच्चनआज 11 ऑक्टोबरला त्यांचा 81वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बी यांनी हिंदी सिने जगताला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दरम्यान आता त्यांचे काही आगामी चित्रपट रुपेरी पडद्यावर लवकरच प्रदर्शित होणार आहेत, याबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा...

Amitabh Bachchan Upcoming Movies
अमिताभ बच्चनचे आगामी चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 4:02 PM IST

मुंबई - Amitabh Bachchan Upcoming Movies : अमिताभ बच्चन गेल्या सहा दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहेत. बिग बींनी 1969 साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि आजही त्यांचा प्रवास सुरूच आहे. बिग बींच्या हिट लिस्टमध्ये अनेक चित्रपट आहेत ज्यात डॉन, दिवार, त्रिशुल आणि शोले सारख्या अविस्मरणीय चित्रपट आहेत. बिग बी आजही आपल्या दमदार अभिनयानं रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवत आहेत. आज 11 ऑक्टोबरला बिग बी त्यांचा 81वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्तानं यांच्या आगामी चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत.

'कल्कि 2898 एडी' : अमिताभ बच्चन नाग अश्विनच्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि दीपिका पदुकोण स्टारर हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल. या चित्रपटात कमल हसन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून दिशा पटानी आणि दाक्षिणात्य अभिनेता दुल्कर सलमान यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे.

'गणपथ: हिरो इज बॉर्न' : टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन स्टारर 'गणपत: अ हिरो इज बॉर्न' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता. ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन यांचीही झलक पाहायला मिळाली आहे. ट्रेलरमध्ये बिग बी एका वेगळ्या अंदाजात दिसले. हा चित्रपट 20 ऑक्टोबर रोजी हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.

'सेक्शन 84' : अमिताभ बच्चन यांनी 1 मार्च 2023 रोजी त्यांच्या एक्स हँडलवर 'सेक्शन 84' या चित्रपटाची घोषणा केली होती. हा एक कोर्टरूम ड्रामा चित्रपट असणार आहे, ज्यामध्ये निम्रत कौर, डायना पेंटी आणि अभिषेक बॅनर्जी दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रिभू दासगुप्ता करत आहेत.

'तेरा यार हूं मैं' : टी तमिलवानन दिग्दर्शित 'तेरा यार हूं मैं' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. या चित्रपटात राम्या कृष्णन सुंदर सूर्य हे देखील कलाकार असणार आहेत.

हेही वाचा :

  1. Happy Birthday Amitabh Bahchchan : बच्चन कुटुंबात सर्वाधिक कमाई बिग बीची, अभिषेक आणि ऐश्वर्याला टाकले मागे
  2. Mahadev App and Lion Book App Case : महादेव ॲपनंतर ईडीच्या रडारवर लायन बुक ॲप; 'या' बॉलिवूड कलाकारांची सुरू आहे चौकशी
  3. Mia khalifa : मिया खलिफालाही इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा फटका; नोकरी गेली ना तिची..!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.