ETV Bharat / entertainment

Amir Khan breaks silence : आमिर खानने आगामी चित्रपटाबद्दल सोडले मौन, जाणून घ्या काय म्हणाला... - रजेवर असल्याचे आमिर खानने म्हटले आहे

मीडियापासून चार हात लांब राहणारा आमिर खान कॅरी ऑन जट्टा 3 च्या ट्रेलर लाँच प्रसंगी हजर राहिला होता. यावेळी त्याला त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल विचारण्यात आले होते. यावर तो काय म्हणाला हे अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.

Amir Khan breaks silence
आमिर खानने आगामी चित्रपटाबद्दल सोडले मौन
author img

By

Published : May 31, 2023, 12:55 PM IST

मुंबई - लाल सिंग चड्ढा या चित्रपटात अखेरचा दिसलेला बॉलीवूड सुपरस्टार अमीर खान कॅरी ऑन जट्टा 3 च्या ट्रेलर लाँच प्रसंगी हजर राहिला होता. त्याने काही काळासाठी फिल्म इंडस्ट्रीतून विश्रांती घेतली असून तो आपल्या कौटुंबीक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची कामी गुंतला असल्याचे सांगितले जाते.

आपण काही काळ रजेवर असल्याचे आमिर खानने म्हटले आहे. पुन्हा चित्रपटसृष्टीत काम सुरू करण्यापूर्वी त्याला 'भावनिकदृष्ट्या तयार' असणे आवश्यक आहे. कॅरी ऑन जट्टा 3 च्या ट्रेलर प्रीमियरच्या वेळी आमिर मीडियाशी संवाद साधला. त्याच्या पुढच्या प्रोजेक्ट्सबद्दल विचारले असता, आमिरने सध्या ट्रेलर लॉन्च होत असलेल्या कॅरी ऑन जट्टा 3 ला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. तो म्हणाला, 'कॅरी ऑन जट्टा 3 साठी तुम्हा सर्वजण उत्सुक असले पाहिजेत. मी अजून माझ्या आगामी प्रोजेक्टवर निर्णय घेतलेला नाही. सध्या, मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. त्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला आत्ता तेच करायचे आहे. जेव्हा मी भावनिक दृष्ट्या तयार असेल तेव्हा मी चित्रपट बनवीन.'

आमिर खान लाल सिंग चड्ढा या चित्रपटात शेवटचा दिसला होता. हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर हादरा बसला होता. दरम्यान, विरोधकांनी घातलेल्या बॉयकॉटचाही त्रास चित्रपटाला झाला. पण हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला तेव्हा समिक्षक आणि प्रेक्षकांना तो खूप आवडला. हा चित्रपट हॉलिवूड क्लासिक फॉरेस्ट गंपचा अधिकृत हिंदी रिमेक होता आणि त्यात करीना कपूर खान आणि मोना सिंग यांनी भूमिका केल्या होत्या. डिसेंबर 2022 मध्ये आमिर खानने काजोल आणि रेवतीच्या सलाम वेंकीमध्ये एक छोटीशी भूमिका केली होती. आमिरने त्याच्या पुढील चित्रपटाची माहिती अद्याप उघड केलेली नाही.

कॅरी ऑन जट्टा 3 च्या प्रीमियरच्या वेळी केलेल्या कमेंमध्ये आमिरने द कपिल शर्मा शो या विनोदी मालिकेत काम करणाऱ्या अभिनेता कपिल शर्माचे कौतुक केले. या चित्रपटात गिप्पी ग्रेवाल, बिन्नू ढिल्लन, सोनम बाजवा, गुरप्रीत घुग्गी आणि जसविंदर भल्ला अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट 29 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

१ ) - Priyanka Chopra :प्रियांकाने दिलेल्या उत्तरामुळे करण जोहर निरुत्तर

२) - Mi Honar Superstar Chhote Ustad 2 : मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २ च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी उचललीय वैदेही परशुरामीने!

३ ) - Kangana Ranaut News : कंगना रनौतने शेअर केला माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पचा व्हिडिओ; म्हणाली...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.