ETV Bharat / entertainment

Sanjay Dutt : 'डबल इस्मार्ट' चित्रपटाच्या सेटवर संजय दत्त जखमी - चित्रपटाच्या सेटवर संजय दत्त झाला जखमी

'डबल इस्मार्ट' चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान संजय दत्त जखमी झाला आहे. संजय दत्तच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आता 'डबल इस्मार्ट' चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाध यांनी सोशल मीडिया एक फोटो शेअर केला आहे.

Sanjay Dutt
संजय दत्त
author img

By

Published : Aug 14, 2023, 4:02 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे. पुरी जगन्नाधचा आगामी चित्रपट 'डबल आईस्मार्ट' सेटवर हा अपघात झाला आहे. संजय दत्त आता बरा असून काळजी करण्यासारखे काही नसल्याचे सांगण्यात येत आहे. बँकॉकमध्ये एका हाय-ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान ही घटना झाली आहे. दरम्यान संजय दत्त हा सेटवर जखमी झाल्याच्या बातम्या समोर येत असताना, पुरी जगन्नाधने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये संजय हा नेहमाप्रमाणेच सुंदर दिसत आहे. संजयच्या डोक्याला दुखापत झाली माहिती समोर येत आहे. संजय दत्तचे अनेक बॅक टू बॅक चित्रपट सध्या येत आहेत आणि हे चित्रपट चाहत्यांना देखील आवडत आहेत.

संजय दत्तचे लूक : 'डबल आईस्मार्ट' या चित्रपटामधील संजय दत्तचे लूक याआधी प्रदर्शित करण्यात आले होते. या लूकमध्ये तो एका वेगळ्याच अंदाजात दिसत होता, त्यामुळे संजयच्या या चित्रपटाची वाट चाहते खूप आतुरतेने पाहत आहे. पॅन इंडिया निर्मित या चित्रपटात संजय हा 'बिग बुल'ची भूमिका साकारणार आहे. दरम्यान संजय दत्त फर्स्ट लूक पोस्टरमध्ये स्टायलिश अंदाजात दिसला होता. संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी फर्स्ट लुक पोस्टर शेअर केले होते. फर्स्ट लुक पोस्टरमध्ये संजय हा काळ्या रंगाच्या सूट, अंगठ्या आणि उत्कृष्ट घड्याळ टॅटूसह दिसला होता. या पोस्टरमध्ये सिगार ओढताना दिसला आहे.

'शंकर' चित्रपटाचा सीक्वल : राम पोथीनेनी आणि पुरी जगन्नाथ यांच्या पॅन इंडिया चित्रपटात संजय हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'डबल आईस्मार्ट' हा चित्रपट ब्लॉकबस्टर चित्रपट 'शंकर' चित्रपटाचा सीक्वल आहे. 'शंकर' चित्रपट १८ जुलै २०१९ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. 'डबल आईस्मार्ट' या चित्रपटाची निर्मिती पुरी जगन्नाध आणि चार्मी कौर करत आहे. हा चित्रपट वर्षी ८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'डबल आईस्मार्ट' हा चित्रपट तेलगू, हिंदी, कन्नड, तामिळ आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. Kangana Ranaut : कंगना रणौतने 'चंद्रमुखी २'मध्ये केले भरतनाट्यम ; पण नृत्यामुळे झाली ट्रोल
  2. Dharmendra and Sunny deol : 'गदर २' च्या यशाचा जल्लोष, सनी देओल आणि धर्मेंद्रने मानले चाहत्यांचे आभार
  3. Bigg Boss OTT 2 finale : अंतिम फेरीपूर्वी अभिषेक मल्हान रुग्णालयात दाखल, चाहत्यांची काळजी वाढली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.