वॉशिंग्टन - "ओम जय जगदीश हरे" आणि "जन गण मन" चे नव्या पध्दतीने सादरीकरण करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी आफ्रिकन-अमेरिकन गायिका मेरी मिलबेन भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत येणार आहे. इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (ICCR) च्या निमंत्रणावरून भारतात येण्यापूर्वी मिलबेन यांनी एक निवेदन जारी केले आहे. यात तिने लिहिले की, 1959 मध्ये भारत भेटीवर आलेल्या डॉ. मार्टिन ल्यूथर किंग जूनियर यांच्या पावलावर पाऊल ठेवून मला 75 व्या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना अमेरिकेचा एक सांस्कृतिक राजदूत म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान वाटत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
निवेदनानुसार मिलबेन या पहिल्या अमेरिकन कलाकार आहेत ज्यांना ICCR ने स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणारी ती अधिकृत पाहुणी असेल. मिलबेन म्हणाल्या की, या समृद्ध मातृभूमीचा अनुभव घेण्याची, भारत आणि जगभरातील भारतीय समुदायासोबतचे आपले फलदायी नाते साजरे करण्याची आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या या महत्त्वपूर्ण उत्सवादरम्यान अमेरिका आणि भारताची महत्त्वपूर्ण लोकशाही युती अधिक मजबूत करण्याची संधी मिळाल्याने मला अत्यंत आनंद होत आहे. ती म्हणाली की मी माझ्या पहिल्या भारत भेटीची तयारी करत असताना, माझ्या हृदयाचे ठोके डॉ. किंगच्या शब्दांची पुनरावृत्ती होत आहे की, 'इतर देशांमध्ये मी पर्यटक म्हणून जाऊ शकतो, परंतु भारतात मी एक यात्रेकरू म्हणून येतो. मिलबेन तिच्या भारत भेटीदरम्यान दिल्ली व्यतिरिक्त लखनौला जाण्याचा विचार करत आहे.
हेही वाचा - प्रियंका चोप्रा पती निक जोनासचे चुंबन घेतानाचा व्हिडिओ व्हायरल!!