हैदराबाद - Allu Arjun receives grand welcome : तेलगू स्टार अल्लू अर्जुनचा मंगळवारी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. दिल्लीहून तो हैदराबादला परतल्यानंतर त्याचे चाहत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलंय. त्याच्या आगमनानंतर ढोल आणि फटाक्यांची आतषबाजी करत समर्थकांनी स्वागत केलं
![Allu Arjun receives grand welcome](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/19-10-2023/alu1_1910newsroom_1697692563_763.jpg)
'पुष्पा: द राइज - पार्ट 1' चित्रपटातील उत्कृष्ट भूमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. राजधानी दिल्लीमधये झालेल्या एका शानदार समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अल्लू अर्जुनला मिळालेला हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे. पांढरा सूट परिधान करून त्यानं पत्नी स्नेहा रेड्डीसह या सोहळ्याला हजेरी लावली होती.
![Allu Arjun receives grand welcome](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/19-10-2023/alu2_1910newsroom_1697692563_244.jpg)
विशेष म्हणजे, पुष्पा चित्रपटाच्या म्यूझिक स्कोअरसाठी संगीतकार देवी श्री प्रसाद यालाही राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. देवी श्री प्रसाद आणि अल्लु अर्जुन हे दोघंही लहानपणापासूनचे मित्र आहेत. चेन्नईच्या रस्त्यापासून सुरू झालेला त्यांच्या मैत्रीचा प्रवास दिल्लीच्या भव्य राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यापर्यंत कायम आहे. आपल्यासोबत मित्रालाही राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्याचा आनंद अल्लु अर्जुननं सोशल मीडियावर पोस्ट लिहून व्यक्त केला होता. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात दाक्षिणात्य कलाकारांचा दबदबा पाहायला मिळाला. आरआरआर चित्रपटासाठी दिग्दर्शक एसएस राजामौली आणि संगीतकार एमएम किरवाणी यांनाही राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
मंगळवारी त्यानं आपल्या इंस्टाग्राम राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्युरी, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि भारत सरकराचं आभार मानलं. आपल्या चित्रपटाला पाठबळ देणाऱ्या सर्वांनाही त्यानं धन्यवाद दिलं. ऑगस्टमध्ये हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हाही त्यानं कृतज्ञता व्यक्त केली होती. त्यावेळी त्यानं लिहिलं होतं, 'देशभरातील विविध श्रेणी आणि भाषांमधील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुमची कामगिरी अतिशय प्रशंसनीय आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून मिळत असलेल्या प्रेम आणि शुभेच्छांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.'
दरम्यान, अल्लू अर्जुन स्टारर बहुप्रतीक्षित 'पुष्पा 2: द रुल' चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -
२. Mehreen Pirzada : वैवाहिक बलात्कारच्या सीनमुळे मेहरीन पिरजादा ट्रोल; दिलं सडेतोड उत्तर...