ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या पुष्पा २ च्या शूटिंगला झाली पूजेने सुरूवात - पुष्पा द राइज

पुष्पा 2 या चित्रपटाचे शूट सुरु झाले आहे. सोमवारी चित्रपटाच्या सेटवर खास पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यातील काही फोटो आता इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. या फोटोत रश्मिका मंदान्ना दिसत असून अल्लू अर्जून कामा निमित्य अमेरिकेत गेला असल्याचे तो पूजेला हजर नव्हता.

पुष्पा २ च्या शूटिंगला झाली पूजेने सुरूवात

author img

By

Published : Aug 22, 2022, 1:21 PM IST

हैदराबाद - पुष्पा द राइज चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना दुसऱ्या भागासाठी सज्ज झाले आहेत. पुष्पा चित्रपटाचा दुसरा भाग पुष्पा: द रुल या सिक्वेलचे शूटिंग सुरू होत असून सोमवारी यासाठी पूजा आयोजित करण्यात आली आहे. पूजेच्या कार्यक्रमातील फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहेत.

ट्विटरवर अल्लू अर्जुन फॉक्स या युजर्सच्या फॅन क्लबने पूजेचा एक फोटो शेअर केला आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे, "पुष्पा द रुल पूजा सोहळा सुरू झाला. पुष्पराज अल्लू अर्जुन गायब आहे." रश्मिका मंदान्ना चित्रपटाच्या क्रू मेंबर्ससह एथनिक वेअरमध्ये दिसली होती. अल्लू अर्जुन मात्र समारंभातील चित्रांमध्ये दिसला नाही कारण तो सध्या बिग अॅपलमध्ये इंडिया डे सेलिब्रेशनसाठी न्यूयॉर्कमध्ये आहे.

पुष्पा २ च्या शूटिंगला झाली पूजेने सुरूवात
पुष्पा २ च्या शूटिंगला झाली पूजेने सुरूवात

याआधी, मिथ्री मूव्ही चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक घोषणा पोस्टर शेअर केले होते की पुष्पा सिक्वेल फ्लोअरवर जाण्यासाठी सज्ज आहे. सोमवारी, 22 ऑगस्ट रोजी एक विशेष पूजा होणार असल्याचेही त्यांनी उघड केले होते. 'पुष्पा: द राइज, सुकुमार दिग्दर्शित अॅक्शन एंटरटेनर, 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याचे सर्वत्र कौतुक झाले. मुत्तमसेट्टी मीडियाच्या सहकार्याने मैत्री मुव्ही मेकर्सचे नवीन येरनेनी आणि वाय रविशंकर यांनी याची निर्मिती केली आहे.

अल्लू अर्जुन पुष्पा राजच्या भूमिकेत असलेल्या या चित्रपटात रश्मिका मंदान्ना देखील श्रीवल्लीच्या मुख्य भूमिकेत आहे. जगभरातील तिकीट काउंटरवर पुष्पा चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती.

हेही वाचा - Watch Video सिध्दार्थसोबतच्या लग्नावरुन कियारा अडवाणीला शाहिद कपूरने चिडवले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.