मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे आजोबा नरेंद्रनाथ राजदान यांचे गुरुवारी निधन झाले. आलियाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर आजोबांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. तिने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील तिच्या 'नाना' चा थ्रोबॅक व्हिडिओ पोस्ट केला आणि तिच्या आयुष्यातील हिरोबद्दलच्या आठवण जागवल्या.
इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत आलियाने लिहिले, 'माझे आजोबा. माझे हिरो. वयाच्या 93 पर्यंत ते गोल्फ खेळत होते. माझ्याकरीता त्यांनी सर्वोत्तम ऑम्लेट बनवले, उत्तम गोष्टी सांगितल्या, व्हायोलिन वाजवली, माझ्यासोबत खेळले. त्यांनी क्रिकेटवर आणि चित्र काढण्यावर प्रेम केले. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपल्या कुटुंबावर प्रेम केले. माझे ह्रदय दुःखाने आणि तितकेच प्रेमानेही भरुन पावले आहे. कारण माझ्या आजोबांनी मला केवळ आनंदच दिला आणि त्याबद्दल आशीर्वाद आणि कृतज्ञता वाटते की त्यांनी मला या प्रकाशात वाढवले'.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
ही दुर्दैवी बातमी समजल्यानंतर आलियाचे चाहते आणि चित्रपट उद्योगातील सदस्य तिच्या दुःखात सामील झाले व शोक व्यक्त करत तिचे सांत्वन केले. चित्रपट निर्माते दिग्दर्शक करण जोहर यांनी आलियाला धीर देण्याचा प्रयत्न केला व सांत्वपणर शब्द लिहिले. सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी तिला शोकसंदेश पाठवले आहेत. आलियाची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री सोनी राजदान यांनीही तिच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सोनी राजदान यांनी वडिलांबद्दल शोक व्यक्त करताना लिहिले, 'तुम्ही आमच्यासाठी पृथ्वीवरील देवदूत होतात. तुम्ही आम्हाला आपले म्हणून मानले याबद्दल तुमचे आभार. तुमच्या प्रकाशाच्या तेजात जीवन धन्य झाले. तुमच्या प्रकाशाच्या तेजात जीवन जगल्याबद्दल खूप आभारी आहे. तुमच्या स्पर्शाने, मायेने, सौम्य आणि चैतन्याने मला खूप आनंद झाला. आम्ही तुमच्या आत्म्यापासून कधीही विभक्त होणार नाही'.
हेही वाचा -
१) - R Madhavan : वाढदिवसाच्या दिवशी आर. माधवन दिसला शुटिंगमध्ये व्यग्र
२) - Ankita Lokhande : अंकिता लोखंडेने व्हिडिओतून जागवल्या सुशांत सिंग राजपूतसोबतच्या आठवणी
३) - Sara Ali Khans Reply To Trollers : मंदिर भेटीनंतर ट्रोल करणाऱ्यांना सारा अली खानचे चोख प्रत्युत्तर