ETV Bharat / entertainment

Alia Bhatt And Ramayana : आलिया भट्ट नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटामधून पडली बाहेर - Ramayana movie

चित्रपट निर्माते नितेश तिवारी लवकरच रामायणावर आधारित चित्रपट बनविणार आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट सीतेची भूमिका साकारणार होती. पण आता ती चित्रपटातून बाहेर पडल्याची बातमी समोर येत आहे.

Alia Bhatt And Ramayana
आलिया भट्ट आणि रामायण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 12:07 PM IST

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'रामायण' चित्रपटाची चर्चा सुरू आहे. नितेश तिवारीच्या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना राम आणि सीतेच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले होते. त्यानंतर हे दोघे एकत्र काम करण्याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र, आता या चित्रपटात आलिया आणि रणबीर कपूरला एकत्र पाहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. आलिया भट्टने या चित्रपटापासून स्वतःला आता दूर केले आहे. चित्रपट क्षेत्रातून मिळत असलेल्या माहितीनुसार आलिया तिच्या व्यग्र शेड्युलमुळे या प्रोजेक्टचा भाग होऊ शकणार नाही. या चित्रपटात आलिया सीतेची भूमिका साकारणार असल्याची चर्चा सुरू होती.

आलिया भट्ट रामायण चित्रपटात दिसणार नाही : आलियाच्या बऱ्याच चित्रपटांचे शूटिंग सुरू होण्यास काही वेळ बाकी आहे. त्यामुळेच आलिया ही 'रामायण' चित्रपटाला वेळ देऊ शकणार नाही म्हणून तिने हा निर्णय घेतला आहे. आलियाने सर्व तारखा आधीच बुक केल्या आहेत आणि तिला तिच्या इतर प्रोजेक्टसाठी देखील वेळ काढावा लागणार आहे. यामुळे आलियाने व्यग्र शेड्यूल पाहता या चित्रपटापासून स्वत:ला वेगळे केले आहे. दरम्यान आलिया प्रोजेक्टमधून बाहेर पडली, हे अद्याप निर्मात्यांकडून अधिकृत विधान समोर आलेलं नाही. सध्या चित्रपटाच्या कास्टवर दिग्दर्शकाचे लक्ष आहे.

रणबीर कपूर आता चित्रपटात रामची भूमिका साकारणार : या चित्रपटात रणबीर कपूर रामच्या भूमिकेत दिसणार आहे. आलिया भट्ट चित्रपटातून बाहेर पडल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र चित्रपटात रणबीर कपूरबाबत अशी कोणतीही बातमी समोर आलेली नाही. त्याचबरोबर केजीएफ स्टार (KGF) यश हा रावणाची भूमिका या प्रोजेक्टमध्ये साकारू शकतो. यापूर्वी यशने हा चित्रपट सोडल्याच्या अफवा देखील सुरू होत्या.

वर्कफ्रंट : आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडेच तिने 'हार्ट ऑफ स्टोन'मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. याशिवाय आलियाच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'नेही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. तसेच आलियाकडे फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' हा चित्रपटही आहे, ज्यामध्ये ती कतरिना कैफसोबत दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा दिसणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या, मात्र व्यग्र शेड्युलमुळे तिने या चित्रपटापासून स्वतःला दूर केले आहे.

हेही वाचा :

  1. Gadar 2 vs OMG 2 box office day 13: 'गदर २' आणि 'ओ माय गॉड २' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर करत आहेत जबरदस्त कामगिरी...
  2. Chandrayaan 3 Landing : मिशन मून आणि अवकाशवर आधारित बॉलिवूड चित्रपट...
  3. Disha Parmar Vaidya : दिशा परमारने शेअर केला बेबी बंप फ्लॉंट करताचा फोटो...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.