ETV Bharat / entertainment

Alia Bhatt Trolled:नाटू नाटू गाण्याने गोल्डन ग्लोब जिंकल्यानंतर आलिया भट्ट झाली ट्रोल - Golden Globe Award

Alia Bhatt Trolled: गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकून इतिहास रचणाऱ्या आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या धमाकेदार गाण्यामुळे आलिया भट्ट सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे. का हे इथे जाणून घ्या.

आलिया भट्ट झाली ट्रोल
आलिया भट्ट झाली ट्रोल
author img

By

Published : Jan 12, 2023, 4:56 PM IST

मुंबई - आलिया भट्टच्या आरआरआर चित्रपटाने इतिहास रचला आहे. हे वाक्य तुम्हाला विचित्र वाटले असेल... पण या शब्दांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. हा सगळा गदारोळ का झाला, हे प्रथम जाणून घेऊया. दक्षिण चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली दिग्दर्शित राम चरण तेजा-ज्युनियर एनटीआर यांच्या भूमिका असलेल्या 'आरआरआर' या चित्रपटातील नाटू नाटू या सुपरहिट गाण्याने गोल्डन ग्लोब अवॉर्ड जिंकून भारतीय चित्रपटसृष्टी जगभरात गाजवली, त्यानंतर ही बातमी प्रसिद्ध झाली. ती म्हणजे आलिया भट्टच्या 'आरआरआर' चित्रपटाने इतिहास रचला!, ज्यावर सोशल मीडिया यूजर्स नाराज झाले आणि अभिनेत्रीला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

एका यूजरने लिहिले की, 'आरआरआरमध्ये आलिया भट्टपेक्षा टायगरला जास्त स्क्रीन टाईम मिळाला'. दुसरा युजर म्हणाला की जर आरआरआर आलिया भट्टचा चित्रपट असेल तर मी टाटा स्टीलचा मालक आहे.

त्याच वेळी, काही युजर्स असेही आहेत ज्यांनी मजेदार मीम्सद्वारे आरआरआर चित्रपटातील आलिया भट्टचे योगदान दर्शवले आहे. एकामागून एक मीम्स शेअर करून लोक आलिया भट्टला ट्रोल करत आहेत.

असे बरेच युजर्सदेखील आहेत जे असे म्हणत आहेत की आलिया भट्टसह बॉलिवूड स्टार्स दक्षिण चित्रपट उद्योगातून आपली छाप पाडत आहेत. इतकेच नाही तर बॉलीवूडमध्ये असा चित्रपट बनवणे हे फक्त एक स्वप्न आहे, जे स्वप्नच राहील, असेही युजर्स म्हणत आहेत.

एस एस राजामौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपटाने मूळ गाण्यासाठी गोल्डन ग्लोब मिळवला, मात्र सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर नॉन-इंग्रजी पुरस्कार हातातून निसटला. आरआरआरवर मात करत अर्जेंटिना 1985 ला सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर नॉन-इंग्रजी पुरस्कार मिळाला. आरआरआर हा भारतातील सर्वात मोठा चित्रपट होता. या वर्षी गोल्डन ग्लोब्समध्ये या चित्रपटाकडून मोठ्या आशा बाळगल्या जात होत्या. मात्र चित्रपटाची टीम आणि संपूर्ण भारतवासीयांना एका डोळ्या हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसूचा अनुभव आला. आरआरआरमधील नाटू नाटू गाण्याला मूळ गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला मात्र सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर नॉन-इंग्रजी पुरस्काराने यशापासून हुलकावणी दिली.

आरआरआर या चित्रपटाला कोरियन रोमँटिक मिस्ट्री डिसीजन टू लीव्ह, जर्मन अँटी वॉर ड्रामा ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, ऐतिहासिक नाट्य असलेला अर्जेंटिना, 1985 आणि फ्रेंच-डच कमिंग-ऑफ-एज ड्रामा क्लोज द नॉन-इंग्रजी श्रेणीमध्ये नामांकन मिळाले होते. आरआरआर चित्रपटाने जगभरात 1,200 कोटींहून अधिक (अंदाजे) बॉक्स ऑफिसवर कलेक्शन केल्याने ती एक आंतरराष्ट्रीय घटना बनली होती.

आलियाचे नाव चित्रपटाशी जोडल्याबद्दल अनेक युजर्स संतापले आहेत आणि म्हणत आहेत की आलिया भट्ट या चित्रपटात नाममात्र दिसली आहे, तिला श्रेय देणे म्हणजे चित्रपटाच्या संपूर्ण टीमवर अन्याय करण्यासारखे आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, करण जोहर निर्मित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात आलिया भट्ट रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय आलिया 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

हेही वाचा - Amrish Puri Death Anniversary: डोक्यात सतत गुंजत राहणारे अमरीश पुरींचे पाच जबरदस्त डायलॉग्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.