ETV Bharat / entertainment

ALIA BHATT THANKS AUDIENCE : 'रॉकी और रानी'ची यशस्वी घोडदौड सुरूच, आलिया भट्टने मानले प्रेक्षकांचे आभार - रॉकी और रानी की प्रेम कहानी

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर तुफान कमाई करत आहे. दरम्यान आता नुकतीच एक पोस्ट आलिया भट्टने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. काय आहे पोस्टमध्ये जाणून घ्या...

rocky aur rani kii prem kahaani
रॉकी और रानी की प्रेम कहानी
author img

By

Published : Jul 31, 2023, 6:30 PM IST

मुंबई: आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा स्टारर चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटगृहांमध्ये चांगलाच कमाई करत आहे. चित्रपटाची राणी म्हणजेच आलिया भट्टने रणवीर सिंगसह चित्रपट निर्माता करण जोहरसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. याशिवाय तिने तिच्या चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. आलिया ही 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या संबंधित नवीन नवीन पोस्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे. आलियाने सोमवारी, पोस्ट शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'लव्ह है तो सब है'. माझ्या हृदयाच्या तळापासून तुम्हा सर्वांचे आभार, कृतज्ञता आणि प्रेम नेहमी. रॉकी, रानी आणि या कहानीचे आमचे निर्माता असे तिने तिच्या पोस्टमध्ये लिहले आहे.

फोटोमधील लूक : आलिया आणि रणवीर या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. तसेच करण पिवळ्या टी-शर्टमध्ये दोन्ही स्टार्ससोबत कॅमेरासाठी पोझ देताना दिसत आहे. आलियाच्या या पोस्टवर चित्रपट कलाकारांसह अनेक चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहेत. या पोस्टवर झोया अख्तरने हसरा इमोजीसह स्टार पोस्ट केला आहे. याशिवाय अनेक चाहत्यांनी आलियाचे कौतुक करत या चित्रपटाला 'सर्वोत्तम' असे म्हटले आहे. तसेच एका चाहत्याने या पोस्टवर कमेंट करत लिहले , 'इतका अप्रतिम चित्रपट बनवल्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि धन्यवाद'. इतर चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये लाल हार्ट इमोजीसह चित्रपटाची तसेच कलाकारांची प्रशंसा केली आहे.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाने केली झटपट कमाई : या चित्रपटाने ११ कोटींहून अधिक कलेक्शन पहिल्या दिवशी केले होते. दरम्यान रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने १६ कोटींचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला. याशिवाय तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने १९ कोटी कमाई करून एक विक्रम रचला आहे. त्यानंतर रणवीर-आलियाच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ४६ कोटींवर पोहोचले आहे.

हेही वाचा :

  1. Dream Girl 2 Teaser : 'ड्रीम गर्ल २' चा दिलखेचक टीझर रिलीज, ट्रेलरची प्रतीक्षा सुरू
  2. Raghava Lawrence shares first look : 'चंद्रमुखी २' मधील राघव लॉरेन्सचा 'वेट्टय्यान राजा' फर्स्ट लूक प्रसिद्ध
  3. Made in Heaven Season 2 : झोया अख्तरचा 'मेड इन हेवन सिझन २' 'या' तारखेला होणार रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.