मुंबई - शाहरुख खानच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त यशराज फिल्म्सने पठाणचा टीझर सोडला आहे. या चित्रपटातून 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी शाहरुख सज्ज झाला आहे. या टिझरचे सर्व थरातून कौतुक होत अून अभिनेत्री आलिया भट्ट व दीपिका पदुकोणने सोशल मीडियावरुन यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रिलीज झाल्यानंतर अवघ्या तासाभरात पठाणच्या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. चित्रपटातील SRK आणि दीपिकाच्या लूकवर चाहत्यांचे लक्ष वेधले जात असताना, चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटीही पठाणच्या टिझरचे कौतुक करत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
आलिया, हिने डिअर जिंदगीमध्ये SRK सोबत स्क्रीन स्पेस शेअर केली आहे आणि तिच्या पहिल्या प्रॉडक्शन व्हेंचर डार्लिंग्स चित्रपटाच्या सह-निर्मितीसाठी सुपरस्टारसोबत हातमिळवणी केली आहे. आलिया ही पठाण टीझरवर प्रतिक्रिया देणाऱ्यांपैकी पहिली अभिनेत्री होती. पठाणचा टfझर शेअर करताना तिने इंस्टाग्राम स्टोरीजवर फटाक्यांच्या इमोजीसह लिहिले , "जस्ट नेक्स्ट लेव्हल!!!!"
SRK त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये व्यग्र दिसत असताना, दीपिकाने पठाण टीझरसाठी आलियाच्या कौतुकाच्या पोस्टला प्रतिसाद दिला. "धन्यवाद मामा! ," असे दीपिकाने इंस्टाग्राम स्टोरीजवर हार्ट इमोजीसह लिहिले.
आलिया भट्ट शिवाय, बिपाशा बसू, अर्जुन कपूर, हृतिक रोशन, सुझैन खान आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी पठाणच्या टिझरवर आनंद व्यक्त केला आहे.
"हाय-ऑक्टेन स्पाय थ्रिलर" म्हणून ओळखला जाणारा पठाण हा चित्रपट वॉर आणि बँग बँग फेम सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - Srk Turns 57: आगामी चित्रपट सुपरहिट होण्यासाठी शाहरुखने आखलाय जबरदस्त प्लॅन