मुंबई - निर्माता करण जोहरने चार वर्षांनंतर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या रोमँटिक-ड्रामा चित्रपटासाठी कॅमेरा उचलला होता. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर स्वतः करत होता. आता चित्रपट पुढे ढकलण्यात आल्याची बातमी येत आहे. यामागचे कारण आलिया भट्टची प्रेग्नेंसी असल्याचे सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण जोहरने आलिया भट्टची प्रेग्नेंसी लक्षात घेऊन चित्रपटाचे काही शेड्यूल वाढवली आहेत. ऑगस्टमध्ये शूट सुरू होणार होते. आता हे सीन्स आता आलियाच्या डिलिव्हरीनंतरच शूट होणार असल्याचं बोललं जात आहे. करण जोहरचा हा चित्रपट फेब्रुवारी 2023 मध्ये पूर्ण होणार होता, ज्याला आता विलंब होऊ शकतो.
त्यामुळे आता 2023 च्या पहिल्या तिमाहीच्या 10 ते 15 दिवसांत करण जोहर चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करणार आहे. मीडियानुसार, आलियामुळे उशीर झाल्यामुळे चित्रपटाची रिलीज डेटही बदलली जाऊ शकते. हा चित्रपट 2023 च्या व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता.
करण जोहर त्याचा सातवा चित्रपट दिग्दर्शक करत आहे. करणने त्याच्या करिअरमध्ये कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना, माय नेम इज खान, स्टुडंट ऑफ द इयर आणि ए दिल है मुश्कील या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
हेही वाचा - "सुष्मिताच्या निवडीवर शंका घेण्यास जागा नाही" रोहमन शॉल