ETV Bharat / entertainment

Alia Bhatt and Ranbir Kapoor : आलिया भट्ट-रणबीर कपूर निघाले सुट्टीला.. मुंबई विमानतळावर झाले स्पॉट! - Alia Bhatt Ranbir Kapoor Mumbai airport

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. यादरम्यान हे जोडपे पापाराझीसाठी पोझ देताना दिसले. हे दोघे अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत.

Alia Bhatt and Ranbir Kapoor
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर
author img

By

Published : Aug 20, 2023, 12:08 PM IST

मुंबई: अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील पॉवरपॅक कपल्सपैकी एक आहे. आलिया आणि रणबीर शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर मुलगी राहासोबत अज्ञात स्थळी जाताना दिसले. रणबीरने निळ्या रंगाचा ट्रॅकसूट घातला होता, तर आलियाने पांढऱ्या रंगाच्या पोशाखावर डेनिम जॅकेट परिधान केले होते. याशिवाय तिने या लूकला खास बनविण्यासाठी मोकळे केस सोडले होते. कॅज्युअल लूकमध्ये हे जोडपे खूप खास दिसत होते. दरम्यान आता पापाराझींने या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये आलिया नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. तसेच या जोडप्याने पापाराझींसाठी एक चांगली पोझ दिली.

आलिया भट्ट आणि रणबीर अज्ञात स्थळी रवाना : मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट आणि रणबीर एकत्र क्वालिटी टाइम घालवण्यासाठी कामातून ब्रेक घेतला आहे. दोघेही शनिवारी रात्री मुंबई विमानतळावरून अज्ञात स्थळी रवाना झाले. या जोडप्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहते या व्हिडिओवर प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरने लिहिले की, 'रणबीर नेहमी उदास का दिसतो?' त्यानंतर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे की, 'ते दोघेही नाराज दिसत आहेत.' आणखी एकाने यूजरने कमेंट करत लिहिले की, ' रणबीरचे लग्न झाल्यानंतर त्याची स्माईल कुठे हरवली आहे', अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहे.

आलिया भट्ट आणि रणबीरचे वर्क फ्रंट : आलिया भट्ट नुकतीच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसली होती. अलीकडेच तिने 'हार्ट ऑफ स्टोन' या अ‍ॅक्शन चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ती गॅल गॅडॉटसोबत दिसली होती. ती पुढे फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दुसरीकडे, रणबीर हा अनिल कपूर आणि बॉबी देओलसोबत 'अ‍ॅनिमल' या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. OMG 2 Box Office Collection Day 9 : 'गदर 2 'शी टक्कर असतानाही अक्षय कुमारचा ओएमजीचा १०० कोटींच्या कल्बमध्ये प्रवेश
  2. GADAR 2 VS PATHAAN : 'गदर २' आणि 'पठाण'चे पहिल्या आठवड्यातील कलेक्शन; 'तारा सिंह' रेकॉर्ड मोडू शकेल?
  3. Kangana Ranaut : रणौतने केली सनी देओलची पाठराखण, वाचा व्हिडिओवर काय दिली प्रतिक्रिया...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.