ETV Bharat / entertainment

अक्षय कुमारच्या करियरची सत्वपरीक्षा ठरणारा 'रक्षा बंधन' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज - अक्षय कुमारचा आगामी चित्रपट

Raksha Bandhan Trailer OUT: अक्षय कुमारच्या रक्षाबंधन या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. जाणून घ्या चित्रपट कधी प्रदर्शित होणार.

'रक्षा बंधन' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
'रक्षा बंधन' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
author img

By

Published : Jun 22, 2022, 11:53 AM IST

मुंबई - अक्षय कुमारच्या रक्षाबंधन या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी रिलीज झाला आहे. यापूर्वी, अभिनेत्याने चित्रपटाशी संबंधित पोस्टर शेअर करून याबद्दल माहिती दिली होती. या वर्षी अजून बरेच चित्रपट प्रदर्शित व्हायचे आहेत. नुकताच या अभिनेत्याचा 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट प्रदर्शित झाला, पण त्याला यश मिळू शकले नाही. हा चित्रपट अक्षय कुमारच्या फ्लॉपच्या यादीत सामील झाला आहे. आता अक्षय कुमार त्याच्या आगामी 'रक्षा बंधन' या चित्रपटासाठी उत्सुक आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. अक्षय कुमारने आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील आव्हान स्वीकारले आहे. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

ट्रेलरमध्ये काय आहे? - चित्रपटाचा ट्रेलर 3 मिनिटांचा असून यामध्ये अक्षय कुमार एका मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्याहून लहान असणाऱ्या चार बहिणींची लग्न त्याला पार पाडायची आहेत. जोपर्यंत ही लग्न पार पडत नाहीत तोवर त्याला स्वतःचे लग्न करता येत नाही. त्याची एक प्रेयसी आहे आणि तिलाही लग्नाची घाई आहे. ट्रेलर एक खेळकर, इमोशनल आणि उत्कंठा वाढवणारा आहे.

अक्षय कुमारने चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले होते, ज्यामध्ये तो त्याच्या ऑनस्क्रीन बहिणींसोबत दिसत होता. अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. 'रक्षा बंधन' चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल रॉय यांनी केले आहे. याआधी त्यांनी अक्षय कुमारसोबत 'अतरंगी रे' चित्रपट केला होता.

रक्षाबंधन Vs लाल सिंग चड्ढा - अक्षय कुमार स्टारर फिल्म 'रक्षा बंधन' आणि आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा सिनेमा 11 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे. अशा परिस्थितीत अक्षय कुमारचा चित्रपट अधिक धोक्यात आला आहे, कारण आमिरचे चाहते बऱ्याच दिवसांपासून 'लाल सिंह चड्ढा'ची वाट पाहत आहेत. त्याचबरोबर अक्षयचे सततचे फ्लॉप चित्रपट चाहत्यांचा भ्रमनिरास करत आहेत.

फ्लॉप चित्रपटांचा सिलसिला जारी - यावर्षी 'बच्चन पांडे' आणि 'सम्राट पृथ्वीराज' हे अक्षय कुमारचे सुपर फ्लॉप चित्रपट ठरले आहेत. असे असतानाही अक्षय कुमारने आमिर खानच्या चित्रपटाशी पंगा घेऊन बॉक्स ऑफिसवर टक्कर घ्यायचे ठरवले आहे.

हेही वाचा - हिना खानच्या या फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा पाहा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.