ETV Bharat / entertainment

'वेलकम'ला 16 वर्षे पूर्ण, अक्षय कुमारनं शेअर केला 'वेलकम टू द जंगल'मधील सीन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 5:34 PM IST

Welcome To The Jungle Shooting : अभिनेता अक्षय कुमारचा कॉमेडी चित्रपट 'वेलकम'ला आज 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रसंगी त्यानं त्याच्या आगामी 'वेलकम टू द जंगल' चित्रपटामधील एक सीन सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Welcome To The Jungle Shooting
वेलकम टू द जंगलचं शूटिंग

मुंबई - Welcome To The Jungle Shooting : अभिनेता अक्षय कुमारच्या कॉमेडी आयकॉनिक चित्रपट 'वेलकम'ला आज 21 डिसेंबर रोजी 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. अनीस बज्मी दिग्दर्शित 'वेलकम' या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल , अनिल कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाद्वारे सर्व कलाकारांनी आपल्या धमाल विनोदानं प्रेक्षकांची मने जिंकली होती. 'वेलकम' हा चित्रपट खूप लोकप्रिय आहे. 'वेलकम' 21 डिसेंबर 2007 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाला 16 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, अक्षय कुमारनं 'वेलकम टू द जंगल' या तिसऱ्या भागाच्या सेटवरील एक अ‍ॅक्शन सीन शेअर केला आहे. अक्षयचा हा अ‍ॅक्शन सीन खूप जोरदार आहे.

अक्षय कुमार आणि संजय दत्तचा अ‍ॅक्शन सीन : अक्षय कुमारनं त्याच्या इंस्टाग्रामवर 'वेलकम टू द जंगल' चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील एक व्हिडिओ शेअर करून लिहिलं, ''किती सुंदर योगायोग आहे, आज आपण 'वेलकम'ची 16 वर्षे साजरी करत आहोत. आज मी या फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाचे शूटिंग करत आहे. संजू बाबाचं या चित्रपटामध्ये स्वागत आहे.'' 'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट निर्मात्यांमधील वादामुळं रखडला असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, आता याला पूर्णविराम अक्षयनं लावला आहे. अक्षयनं शूटिंग सेटवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संजय दत्त हा घोड्याच्या मागे बाईकवरून येत आहे. या घोड्यावर अक्षय बसून आहे.

'वेलकम टू द जंगल' चित्रपटाबद्दल : हा व्हिडिओ स्लो मोशनमध्ये आहे. 'वेलकम टू द जंगल'च्या फर्स्ट लूकमध्ये 25 स्टार्सचे चेहरे समोर आले होते, ज्यामध्ये रवीना टंडन, दिशा पटानी आणि लारा दत्ता यासारख्या सुंदरी अभिनेत्री दिसल्या होत्या. या चित्रपटाची रिलीज डेट ख्रिसमस 2024 साठी निश्चित करण्यात आली आहे. या चित्रपटाची स्टार कास्ट खूप मोठी आहे. 'वेलकम टू द जंगल'चं दिग्दर्शन दिग्दर्शक अहमद खान यांनी केलं आहे. या चित्रपटाकडून अक्षय कुमारला खूप अपेक्षा आहेत, कारण यापूर्वी रिलीज झालेला त्याचा 'मिशन रानीगंज' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर चांगली कामगिरी करू शकला नाही. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 18.25 कमाई केली.

हेही वाचा :

  1. शाहरुख खान आणि राजकुमार हिराणीच्या पहिल्या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया
  2. 'डंकी' रिलीजनंतर चाहत्यांनी केला जल्लोष ; शाहरुख खाननं मानलं आभार
  3. हृदयविकाराचा झटक्यातून सावरल्यानंतर श्रेयस तळपदेला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.