ETV Bharat / entertainment

Singham Again: 'सूर्यवंशी' या चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अक्षय कुमारचा 'सिंघम अगेन'मधील फर्स्ट लूक प्रदर्शित - Rohit shetty

Singham Again: अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' या चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्तानं खिलाडी कुमारनं रोहित शेट्टीच्या आगामी 'सिंघम 3' या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

Singham Again
सिंघम अगेन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 4:25 PM IST

मुंबई - Singham Again : रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्सचा आगामी चित्रपट 'सिंघम अगेन' सध्या प्रचंड चर्चेत आहे. एकामागून एक या चित्रपटाबद्दल अपडेट्स येत आहेत. या चित्रपटामधील काही पात्रांचे नाव आणि फर्स्ट लूक समोर आले आहेत. अलीकडेच दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ आणि रणवीर सिंग यांचे फर्स्ट लूक समोर आले होते. दरम्यान आता 'सिंघम 3'मधील अभिनेता अक्षय कुमारचा फर्स्ट लूक समोर आला आहे, जो खूप दमदार आहे. अक्षय कुमारनं इंस्टाग्राम अकाऊंटवर 'सिंघम 3'मधील त्याच्या व्यक्तिरेखेची पहिली झलक शेअर केली आहे. या फोटोमध्ये अक्षय हा अ‍ॅक्शनमोडमध्ये दिसत आहे. तो हेलिकॉप्टरमधून उडी मारत आहे.

अक्षय कुमारचा फर्स्ट लूक समोर : अक्षयच्या दोन्ही हातात बंदुक दिसत आहे, ज्यातून तो गोळ्या मारताना दिसत आहे. अक्षयनं फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहल, 'आयला रे आला सूर्यवंशी आला. एटीएस प्रमुख सूर्यवंशीची ही वेळ आहे, तुम्ही तयार आहात का?'. अक्षयचा हा लूक खूप जोरदार आहे. लूकसोबतच त्याच्या 'सिंघम अगेन'मधील व्यक्तिरेखेचं ​​नावही समोर आले आहे. यावेळी चित्रपटात त्याचं नाव वीर सूर्यवंशी असणार आहे. हा चित्रपट मल्टीस्टारर चित्रपट आहे. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा रोहित शेट्टीला आहे. अक्षयनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण कमेंट करून त्याचे कौतुक करत आहेत. एका चाहत्यानं पोस्टवर कमेंट करत लिहलं, 'हा चित्रपट मी नक्की पाहणार आहे' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहलं, 'या चित्रपटाची मी वाट खूप आतुरतेनं पाहत आहेत' आणखी एकानं लिहलं, 'हा चित्रपट खूप दमदार असणार आहे.'

सिंघम पुन्हा कधी रिलीज होणार? : 'सिंघम अगेन'साठी रोहित शेट्टी खूप उत्सुक आहे. अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ, श्वेता तिवारी यांच्यासह अनेक कलाकार अजय देवगणसोबत रोहित शेट्टीच्या 'कॉप युनिव्हर्स सिंघम', 'सिंघम अगेन'च्या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, 'सिंघम अगेन' ऑगस्ट 2024 मध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. Painter Om Swami : चित्रकार शिल्पकार ओम स्वामी यांनी दृष्टीहिन मुलींसाठी राबविला उत्कृष्ट उपक्रम
  2. Anushka Sharma And Virat Kohli : अनुष्का शर्मानं अनोख्या पद्धतीनं दिल्या पती विराट कोहलीला शुभेच्छा
  3. Kangana Ranaut : चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर कंगणा राजकारणाच्या मैदानात? 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे दिले संकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.