मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार केवळ त्याच्या चित्रपटांमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही कॉमेडी आणि मस्तीसाठी ओळखला जातो. अक्षय कुमार शूटिंग सेट आणि प्रमोशनल इव्हेंट्समध्ये मजा केल्याशिवाय राहत नाही याची पुष्टीही अनेक स्टार्सनी केली आहे. आता अक्षय कुमारने स्वतः सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अक्षय कुमारने शेअर केलेला व्हिडिओ रस्त्यातला आहे. या व्हिडिओत त्याच्यासोबत अभिनेत्री रकुल प्रीत सिंग दिसत आहे. अक्षय आणि रकुल चालत जात असताना रस्त्यात मध्ये पाणी साठल्याचे दिसते. अक्षय यातून मार्ग काढण्यासाठी प्रियकरासारखा पुढे सरसावतो आणि विटा शोधून त्यावरुन चालण्यासा रकुलला सांगतो. रकुल जेव्हा पाण्याच्या मध्यभागी पोहोचते तेव्हा अक्षय कुमार तिला माईंड गेमखेळण्यास भाग पाडतो. एकंदरीतच अक्षयची ही रील खूप मजेशीर आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अक्षयने लिहिलंय, हा पूर्णपणे एक मजेशीर खेळ आहे. एक माईंड गेम, तुम्हीही असाच ट्विस्ट असलेला मजेशीर व्हिडिओ आपल्या साथियासोबत बनवा आणि मग आम्ही त्यापैकी एक शेअर करू.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अक्षय कुमार आणि रकुल प्रीत सिंह त्यांच्या आगामी 'कटपुतली' चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. नुकताच या चित्रपटाचा एक अतिशय सस्पेन्सफुल ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्याने प्रेक्षकांना वेड लावले आहे. त्याचबरोबर ट्रेलरनंतर 'साथिया' चित्रपटाचे पहिले रोमँटिक गाणेही रिलीज करण्यात आले आहे.
अक्षय कुमारचा चित्रपट 'कटपुतली' हा दक्षिण चित्रपट 'रत्सासन'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट 2 सप्टेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - चित्रपट निर्माते सावन कुमार टाक यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात