ETV Bharat / entertainment

अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफचं 11 वर्षांच्या डेटिंगनंतर झालं ब्रेकअप - अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफचं ब्रेकअप

Ahan Shetty and Tania Shroff break up : अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचं तानिया श्रॉफसोबत ब्रेकअप झालं आहे. या जोडप्यानं अद्यापही त्याच्या ब्रेकअपबद्दल प्रतिक्रिया दिलेली नाही.

Ahan Shetty and Tania Shroff break up
अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफचं ब्रेकअप झालं
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 23, 2023, 5:31 PM IST

मुंबई - Ahan Shetty and Tania Shroff break up : अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अभिनेता अहान शेट्टी सध्या चर्चेत आहे. अहानचे 11 वर्षाचे जुने नाते तुटल्याची बातमी आता समोर येत आहे. अहान शेट्टीनं गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबत ब्रेकअप केलं आहे. अहान आणि तानिया गेल्या 11 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. तानिया आणि अहान अनेकदा डिनर डेटला एकत्र दिसतात. हे कपल लहानपणापासून एकत्र शिकले आणि नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. तानिया अहानच्या अनेक फॅमिली फंक्शन्सलाही हजेरी लावताना दिसली आहे. याशिवाय ती अहान शेट्टीची बहीण आणि अभिनेत्री अथिया शेट्टीच्या लग्नातही दिसली होती.

तानिया श्रॉफ आणि अहान शेट्टीचं ब्रेकअप : तानिया बॉयफ्रेंड अहानच्या डेब्यू चित्रपट 'तडप'च्या शूटिंग सेटवर त्याच्यासोबत दिसली होती. याशिवाय ती स्क्रीनिंगला देखील हजर होती. दरम्यान या जोडप्याच्या ब्रेकअपच्या बातमीला दुजोरा मिळालेला नाही. तानिया उद्योगपती जयदेव आणि रोमिला श्रॉफ यांची मुलगी आहे. ती एक मॉडेल आणि डिझायनर आहे. मिळालेल्या माहितीनुसार या जोडप्याचं ब्रेकअप होऊन एक महिना झाला आहे. या कपलचं ब्रेकअपचे कारण समोर आलेलं नाही. या बातमीवर कोणतीही प्रतिक्रिया या जोडप्याकडून आलेली नाही. पण दोघांनीही बऱ्याच दिवसांपासून एकही पोस्ट शेअर केलेली नाही. याशिवाय अहान आणि तानिया एकत्र देखील दिसले नाहीत, त्यामुळं त्याचं ब्रेकअप झालं समजलं जात आहे.

अहानचं बॉलिवूडमध्ये पदार्पण : अहानबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तो तारा सुतारियासोबत 'तडप' चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट 3 डिसेंबर, 2021 रोजी डिज्नी हॉस्टारवर रिलीज झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलन लुथरिया यांनी केलं. हा चित्रपट नाडियादवाला ग्रँडसन इंटरटेनमेंट बॅनर खाली बनवला गेला आहे. या चित्रपटामध्ये सुनील शेट्टीही दिसला आहे. सुनील शेट्टीनं तानियाचा अनेकदा उल्लेख केला आहे. त्यानं एका मुलाखतीत सांगितले होतं की, तो तानियाला आपल्या मुलीप्रमाणे मानतो.

हेही वाचा :

  1. प्रियांका चोप्रानं सुरू केली ख्रिसमसची तयारी, निक जोनास आणि मालती मेरीसोबतचे फोटो केले शेअर
  2. प्रभासच्या 'सालार' वादळापुढे अडखळला शाहरुखचा 'डंकी', कमाईत घसरण
  3. 'कल्कि 2898 एडी' पासून 'पुष्पा 2' पर्यंत हे 10 साऊथ चित्रपट 2024 मध्ये होतील प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.