मुंबई - बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा रोहित शेट्टीच्या इंडिया पोलीस फोर्सच्या पहिल्या मालिकेतील कलाकारांमध्ये सामील झाला आहे, अशी घोषणा चित्रपट निर्मात्याने मंगळवारी केली. रोहित शेट्टी द्वारे दिग्दर्शित आणि निर्मीत, अॅक्शन सिरीज प्राईम व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिसवर सेट केली गेली आहे. शेरशाह स्टार सिद्धार्थ मल्होत्रा या मालिकेत दिल्ली पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.
अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार्या या काल्पनिक मालिकेचे उद्दिष्ट "देशभरातील आमच्या पोलिस अधिकार्यांची निःस्वार्थ सेवा, बिनशर्त वचनबद्धता आणि प्रखर देशभक्ती" यांना अभिवादन करणे आहे. शोमध्ये, विवेक ओबेरॉय मल्होत्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोबत एका पोलिसाच्या भूमिकेत देखील दिसणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
इंस्टाग्रामवर रोहित शेट्टीने विवेक ओबेरॉय प्रोजेक्टमध्ये सामील झाल्याची बातमी शेअर केली आणि शोच्या सेटवरून त्याचा फोटो शेअर केला. "आमच्या पथकातील सर्वात अनुभवी वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटा. विवेक आपले स्वागत आहे!!!," असे चित्रपट निर्मात्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. विशेष म्हणजे, रोहित भारतीय पोलिस दलासह दिल्ली पोलिसांवर प्रकाश टाकेल. सिंघम, सिम्बा आणि सूर्यवंशी यांच्या याआधीच्या प्रोजेक्टने गोवा पोलिस आणि महाराष्ट्र पोलिस दलाला ठळक केले आहे.
ओबेरॉय म्हणाला की या मालिकेत सामील होण्यासाठी आणि सुपर कॉपची भूमिका करण्यास उत्सुक आहे. त्यानेही या वेब सिरीजमध्ये सहभागी होत असल्याचे चाहत्यांना सोशल मीडियावरुन कळवले आहे.
कंपनी, दम, साथिया, युवा आणि शूटआउट अॅट लोखंडवाला यांसारख्या हिट चित्रपटांसाठी ओळखला जाणारा विवेक ओबेरॉय, 'इनसाइड एज' या दुसर्या प्राइम व्हिडिओ मालिकेत देखील काम करत आहे. रोहित शेट्टी पिक्चर्सच्या सहकार्याने 'इंडियन पोलिस फोर्स' या अॅमेझॉन ओरिजिनल मालिकेचे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. हा शो पुढच्या वर्षी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - ट्विटरवरही 'शहेनशाह' आहेत बिग बी, 'या' १० सेलेब्सचे आहेत इतके फॉलोअर्स