ETV Bharat / entertainment

Houseful 5 announcement : हाऊसफुल ५च्या घोषणेनंतर, अक्षय कुमार कुटुंबासह सुट्टीवर अज्ञात स्थळी रवाना - हाऊसफुल ५ची घोषणा

अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलगी नितारासोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. अक्षय कुमार शुक्रवारी रात्री अज्ञात स्थळी रवाना झाला आहे.

Houseful 5
हाऊसफुल ५
author img

By

Published : Jul 1, 2023, 3:51 PM IST

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार हाऊसफुल फ्रँचायझी पाचव्या भागासाठी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसविण्यासाठी येत आहे. शुक्रवारी, अक्षयने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर जाहीर केले की हाऊसफुल ५ दिवाळी २०२४ ला थिएटरमध्ये दाखल होईल. ही बातमी शेअर केल्यानंतर लगेचच, अक्षय हा त्याच्या कुटुंबासह चांगला वेळ घालवण्यासाठी अज्ञात ठिकाणी निघून गेला.

अक्षय कुमारला विमानतळावर कुटुंबासह स्पॉट केले: शुक्रवारी रात्री अक्षयला त्याची अभिनेत्री-लेखिका पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलगी नितारासोबत मुंबई विमानतळावर बघितल्या गेले. पापाराझीने अक्षयचा हा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने स्लीव्हलेस बटण असलेले व्ही-नेक जॅकेट आणि ब्लॅक बॅगी ट्राउझर्स घातले आहे. या काळ्या रंगाच्या कॅज्युअल पोशाख अक्षय फार देखणा दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय हा कारमधून खाली उतरताना दिसत आहे. याशिवाय त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलगीही होती. या व्हिडिओमध्ये ट्विंकलने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि यावर एक जांभळ्या रंगाचे ब्लेझरमध्ये घातले आहे. तसेच तिने पँट देखील जांभळ्या रंगाचा परिधान केला आहे. या लूकमध्ये ट्विंकल फार सुंदर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय हा आपल्या मुलीचा हात पकडून आहे. अक्षय किती संरक्षणात्मक पिता आहे याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. मुलगी नितारा गाडीतून बाहेर पडल्यापासून ते फोटोसाठी पोझ देऊन विमानतळावर येईपर्यंत अक्षयने आपल्या मुलीचा हात धरून ठेवला आहे.

अक्षय कुमार फॅमिली मॅन: व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहले, 'फॅमिली मॅन' तर दुसर्‍याने एका कमेंट केली की, 'तो किती चांगला बाबा आहे!' अशा अनेक प्रकारच्या कमेंट या व्हिडिओवर आल्या आहे. दरम्यान, अक्षयच्या वर्क फ्रंटवर, बोलायचे झाले तर तो परिणीती चोप्रासोबत 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू'च्या रिलीजसाठी सज्ज आहे. हा चित्रपट ५ ऑक्टोबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच तो यामी गौतम आणि पंकज त्रिपाठीसोबत 'ओह माय गॉड २' (OMG 2) मध्येही दिसणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Deepika Padukone trolled : सोनाक्षी सिन्हाच्या लूकची 'कॉपी' केल्याने दीपिका पदुकोण ट्रोल झाली
  2. Kangana in strapless outfit : कंगना रणौतने पार्टीत घातला स्ट्रॅपलेस ड्रेस, नेटिझन्सने दाखवला दुपट्टीपणाचा आरसा
  3. Mukhesh ambani gifted gold cradle : मुकेश अंबानीने राम चरणच्या मुलीला १ कोटी रुपयांचा सोन्याचा पाळणा दिला भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.