ETV Bharat / entertainment

Afalatoon trailer: आंधळा, मुका आणि बहिऱ्या गुप्तहेराची धमाल कथा, अफलातूनचा ट्रेलर रिलीज - Afalatoon trailer The story of a blind dumb

आंधळा, मुका आणि बहिरा अशा तीन पात्रांची धमाल असलेल्या अफलातून चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ‘अफलातून’ येत्या २१ जुलैला महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Afalatoon trailer
अफलातूनचा ट्रेलर रिलीज
author img

By

Published : Jul 3, 2023, 4:19 PM IST

मुंबई - अफलातून या मराठी चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या धमाल विनोदी चित्रपटात अतरंगी व्यक्तीरेखा, त्यांचा अफाट आत्मविश्वास आणि गोंधळ वाढवणारे प्रसंग आणि जबरदस्त उत्स्फुर्त टायमिंग असलेले इरसाल संवाद पाहायला मिळतात. १० कोटी रुपयांची फसवणू झाल्यानंतर त्याचा उलगडा करण्याची जबाबदारी तीन डिटेक्टीव्ह्जवर आली आहे आणि ते हा गुंता कसे सोडवतात हे पाहणे कमालीचे उत्कंठावर्धक असणारे आहे. अफलातूनचा ट्रेलर चित्रपटाबद्दलचे कुतुहल निश्चित वाढवणारा आहे.

बऱ्याच वर्षांपूर्वी तीन बंदर नावाचे हिंदीत गाजलेले नाटक आपल्याला आठवत असेल. तर त्यात आंधळा, बहिरा आणि मुका तिघे मिळून एका मुलीची मदत करताना दिसले होते. त्यानंतर मराठीमध्येही ऑल द बेस्ट या नाटकामध्ये याच तीन पात्रांची मुलीवर इंप्रेशन मारतानाची गोष्ट दाखवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अशीच तीन पात्रे गुप्तहेर बनून गुंतागुंत सोडवताना अफलातूनमध्ये दिसणार आहेत. हा एक धमाल विनोदी मनोरंजक असा कथेचा ट्रॅक आहे. श्री, आदि आणि मानव ही आंधळा, मुका आणि बहिरा असणारी पात्रे गुप्तहेरगिरी कसे करु शकतील हा विचारही रोमांचक वाटणारा आहे.

श्री, आदि आणि मानव हे तिघेही वास्तव आयुष्यात उस्ताद असतात. ते एका फसवणूक झालेल्या मारिया नावाच्या मुलीला मदत करण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. त्यांच्या शारीरिक व्यंगांमुळे होणाऱ्या गमती जमतीने अफलातूनचा ट्रेलर भरला असून ते मारियाला मदत करताना कशा अफलातून कागमिरी करतात हे सिनेमात पाहायला मिळणार आहे.

अफलातून या चित्रपटाचे लेखन परितोष पेंटर याने केले असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. साहा अँड सन्स स्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा यांनी या चित्रपटाची संयुक्तपणे निर्मिती केली आहे. सुरेश देशमाने यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून संकलनाची जबाबदारी सर्वेश परब यांनी सांभाळली आहे. संगीतकार कश्यप सोमपुरा असून मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या गाण्यांना चाली लावल्या आहेत.

यातील गाणी अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायली आहेत. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधवसह, कॉमेडियन जॉनी लिव्हर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, जेसी लिव्हर, विष्णू मेहरा रेशम टिपणीस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘अफलातून’ हा धमाल विनोदी चित्रपट येत्या २१ जुलैला महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल.

हेही वाचा -

१. Spkk Box Office Collection Day 4: 'सत्यप्रेम की कथा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालत आहे धुमाकुळ...

२. Malavika Mohanan Pictures : मालविका मोहननने मदुराईमधील थंगालनच्या सेटवरून शेअर केले विहंगम फोटो

३. Zhzb Collection Day 30 : 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट कमाईच्याबाबतीत मागे पडला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.