ETV Bharat / entertainment

Ganpath : टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन स्टारर 'गणपथ'चा प्रोमो झाला प्रदर्शित; रिलीजच्या पहिल्या दिवशी किती करेल कमाई... - क्रिती सेनॉन

Ganpath : टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन यांचा 'गणपथ' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चित्रपटाचा प्रोमो रिलीज झाला असून आगाऊ बुकिंगची आकडेवारी समोर आली आहे.

Ganpath
गणपथ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 2:26 PM IST

मुंबई - Ganpath : टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन स्टारर 'गणपथ- ए हिरो इज बॉर्न' हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. 'हीरोपंती'नंतर टायगर आणि क्रिती जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर रिलीज करण्यात आला होता. या ट्रेलर आणि टिझरला चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सध्या चित्रपटाविषयी बरीच चर्चा सध्या सुरू आहे. 'गणपत - ए हिरो इज बॉर्न' हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई करू शकतो हे पाहू या...

'गणपथ' पहिल्या दिवशी किती कमाई करेल ? : टायगर श्रॉफ 'गणपथ- ए हिरो इज बॉर्न'मध्ये त्याच्या अ‍ॅक्शनचा डबल डोस प्रेक्षकांना देणार आहे. टायगर श्रॉफचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय. दरम्यान आता 'गणपथ' चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगबद्दल बोलायचं झालं तर, सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार चित्रपटाच्या 2D आवृत्तीची आतापर्यंत 7 हजार 590 तिकिटं विकली गेली आहेत. हा चित्रपट 2D मध्ये 1478 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानं आतापर्यंत 2D आवृत्तीमध्ये 9 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. उर्वरित आवृत्त्याबद्दल आणखी माहिती समोर आली नाही.

'गणपथ' दिल्ली-मुंबईत करेल चांगले कलेक्शन : 'गणपथ'च्या आतापर्यंतच्या आगाऊ बुकिंगच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, दिल्ली-एनसीआर आणि मुंबईमध्ये हा चित्रपट चांगला कलेक्शन करेल. सॅकनिल्कनुसार आत्तापर्यंतच्या आगाऊ बुकिंगच्या आधारे, या चित्रपटानं दिल्लीतून 4.58 लाख रुपये आणि मुंबईतून 8.2 लाख रुपयांची कमाई केली आहे. सध्या हा चित्रपट प्रदर्शित होण्यास दोन दिवस बाकी असल्यानं उद्यापर्यंत हा आकडा आणखी वाढेल अशी अपेक्षा केली जात आहे. टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि एली अवराम यांनीही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

'गणपथ' प्रोमो रिलीज : 'गणपथ' या चित्रपटाचा नवा खास प्रोमो शेअर करण्यात आला आहे. 'गणपथ'मध्ये टायगर श्रॉफनं मनाला भिडणारे फायटिंग सीन केले आहेत. क्रितीनेही या चित्रपटात त्याला तितकीच साथ दिली आहे. 'गणपथ'मध्ये क्रिती आणि टायगरची धमाकेदार केमिस्ट्री पाहायला मिळेल. 'गणपथ' या चित्रपटाची निर्मिती पूजा एंटरटेनमेंटने केली आहे. य़ाशिवाय दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'गणपथ' 20 ऑक्टोबर रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Prabhas Wedding : 'सालार' रिलीज झाल्यानंतर अभिनेता प्रभास करेल लग्न ; मावशीनं केला खुलासा...
  2. Leo early morning shows : 'लिओ' रिलीजपूर्वी थलपथी विजयच्या चाहत्यांसाठी एक नाही तर दोन वाईट बातम्या...
  3. 69th National Film Awards : चित्रपट पुरस्काराच्या विजेत्यांसोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली फोटोसाठी पोज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.