ETV Bharat / entertainment

आगामी पॅन इंडिया अ‍ॅक्शन ड्रामामधील आदिवी शेषचा फर्स्ट लूक रिलीज, लवकरच होणार शीर्षकाचा खुलासा - आदिवी शेष

Adivi Shesh first look : साऊथ अभिनेता आदिवी शेष आणि अभिनेत्री श्रुती हासन स्टारर आगामी चित्रपटामधील आदिवीचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झालं आहे. या चित्रपटाचं शीर्षक 18 डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Adivi Shesh first look
आदिवी शेषचं फर्स्ट लूक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2023, 3:03 PM IST

मुंबई - Adivi Shesh first look : साऊथ अभिनेता आदिवी शेष आणि अभिनेत्री श्रुती हासन अ‍ॅक्शन ड्रामामध्ये स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहेत. दरम्यान आदिवी शेषचा फर्स्ट लूक आज, 14 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आला. या चित्रपटाच्या निर्मात्या सुप्रिया यारलागड्डा आहेत. हा चित्रपट अन्नपूर्णा स्टुडिओद्वारे निर्मित असेल, ज्याचे दिग्दर्शन शेनील देव करत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात श्रुती हासन मुख्य भूमिकेत असेल. याशिवाय या चित्रपटाचे सहनिर्माते सुनील नारंग आहेत. आदिवी शेषनं फर्स्ट लूक पोस्टर शेअर करत लिहिलं, ''सरप्राईज हा बॉलीवूड चित्रपट नाही किंवा टीएफआय (TFI) चित्रपट नाही. हा एक पॅन इंडिया सिनेमा आहे''. याशिवाय या पोस्टवर त्यानं हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केला आहे. या पोस्टवर आदिवीनं सांगितलं की, 18 डिसेंबर रोजी या आगामी चित्रपटाचं शीर्षक रिलीज होणार आहे.

आदिवी शेषचा फर्स्ट लूक : आदिवी शेषच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्यानं लिहिलं, ''सर तुम्ही खूप हॅन्डसम दिसता, तुम्ही महेश बाबूला देखील देखणेपणात हरवू शकता''. दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, आदिवी, मी तूझी खूप मोठी चाहती आहे, तुझा चित्रपट मी नक्की पाहणार''. आणखी एकानं लिहिलं, ''सर मी तुमच्या या चित्रपटाची वाट पाहेन. हा चित्रपट खूप जबरदस्त असणार आहे.'' अशा अनेक कमेंटस् या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. दरम्यान, आदिवी शेषनं त्याच्या हिट तेलुगू चित्रपट 'गुडाचारी'चा सीक्वेल असलेल्या 'जी2'च्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे.

चाहत्यांकडून झालं आदिवी शेषचं कौतुक : गेल्या सोमवारी, आदिवी शेषनं चाहत्यांना माहिती देत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं होत की, 'जी 2'चं पोस्टर, माझा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपट''. बनिता संधूही 'जी2' चित्रपटाशी जुळली गेली आहे. 'जी 2'ची कहाणी तिथून सुरू होईल, तेथे 'गुडाचारी' चित्रपटानं शेवट केला. या चित्रपटात गोपी उर्फ एजंट 116 बर्फाळ भागात शत्रूचा सामना करताना दिसणार आहे. 'जी 2'मध्ये आदिवी शेष अ‍ॅक्शन करताना दिसेल. त्याचा अ‍ॅक्शन पॅक लूक रिलीज केला गेला आहे. या चित्रपटासाठी चाहत्यांकडून त्याचे खूप कौतुक होत आहे. टीजी विश्व प्रसाद आणि अभिषेक अग्रवाल निर्मित या चित्रपटात थ्रिलर आणि अ‍ॅक्शन पाहायला मिळेल.

हेही वाचा :

  1. 'नॅशनल क्रश' तृप्ती डिमरीला 'अ‍ॅनिमल'मधील 'भाभी 2'च्या भूमिकेसाठी मिळाली 'एवढी' फी
  2. अर्जुन कपूरला मलायकावरुन केलं जातं ट्रोल, अर्जुन म्हणाला, "ट्रोल करणारे सेल्फीसाठीही तळमळतात"
  3. 'कॉफी विथ करण सीझन 8'मध्ये आदित्य रॉय कपूरनं 'आशिकी 3'बद्दल दिली 'ही' प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.