ETV Bharat / entertainment

YRF's Spy Universe : यशराजच्या स्पाय युनिव्हर्समध्ये आलिया भट्टची एंट्री... - स्पाय युनिव्हर्स

बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट आता रूपेरी पडद्यावर अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. यशराज स्पाय युनिव्हर्समध्ये आता आलियाची एन्ट्री झाली आहे. यापुर्वी आलियाने कधीच एजेंट भूमिका साकारली नव्हती , त्यामुळे प्रेक्षकांना आता आलियाचे वेगळे अवतार बघायला मिळणार आहे...

Alia Bhatt
आलिया भट्ट
author img

By

Published : Jul 14, 2023, 12:44 PM IST

मुंबई: कॅटरिना कैफ आणि दीपिका पदुकोणनंतर आता यशराज स्पाय युनिव्हर्स आपल्या टीममध्ये आणखी एका अभिनेत्रीला सहभागी करणार आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून बॉलिवूडची 'गंगूबाई' म्हणजेच आलिया भट्ट आहे. यशराज बॅनरचे चित्रपट 'पठाण' आणि 'व\र' हे फार प्रेक्षकांना पसंत पडले होते. आता यशानंतर यशराज बॅनर आपला ८वा अ‍ॅक्शन चित्रपट तयार करणार असल्याचे बोलले जात आहे. यशराज बॅनरखाली बनणाऱ्या अ‍ॅक्शन चित्रपटात आता आलिया भट्ट दिसणार आहे. दरम्यान यशराज कॅम्पच्या सर्व स्पाय युनिव्हर्सने बॉक्स ऑफिसवर फार जबरदस्त कमाई केली आहे. यशराज बॅनरचा पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण हे अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसले होते. हा चित्रपट जानेवारी 2023 रोजी रिलीज झाला होता.

यशराज बॅनरच्या स्पाय युनिव्हर्समध्ये आलिया भट्टची एन्ट्री : शाहरुख खानचा चित्रपट पठाण हा सुप्परहिट झाल्यानंतर चाहत्यांनी यशराज स्पाय युनिव्हर्सला मागणी केली होती की याप्रकारचे आणखी चित्रपट तयार करण्यात यावे. त्यामुळे आता यशराज बॅनर हे आता मोठ पाऊल उचलत आहे. पठाण वर्सेस टायगर हा यशराज युनिव्हर्सचा सातवा अ‍ॅक्शन-स्पाय चित्रपट आहे. दरम्यान आता निर्माते आठव्या चित्रपटाची तयारी करत आहेत, ज्यामध्ये आलिया भट्टला कास्ट करण्यात आले आहे. हा आगामी चित्रपट बिग बजेट चित्रपट असेल असे बोलले जात आहे. या चित्रपटामध्ये आलिया ही फीमेल एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे.

आलिया सलमान-शाहरुखसारखी अ‍ॅक्शन करणार : आलिया भट्टला सध्या बॉलिवूडमध्ये फार जास्त चित्रपट मिळत आहे. याशिवाय तिचे अनेक चित्रपट फार हिट झाले आहे त्यामुळे यशराज बॅनरने तिला कास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आता ती यशराज स्पाय युनिव्हर्समध्ये सलमान खान, शाहरुख खान, हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफप्रमाणे दमदार अ‍ॅक्शन करताना रूपेरी पडद्यावर दिसेल.

आलिया पहिल्यांदा दिसेल एजेंटच्या भूमिकेत : आदित्य चोप्रा सध्या फीमेल एजेंटवर एक चित्रपट बनविण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये आलिया ही प्रमुख भूमिकेत असणार आहे. यापुर्वी आलियाने एजेंटची भूमिका ही कधीच रूपेरी पडद्यावर साकारली नाही आहे, त्यामुळे ही संधी आलियासाठी फार जबरदस्त असेल.

चित्रपट कधी सुरू होणार? : मीडिया रिपोर्टनुसार हा चित्रपट २०२४ मध्ये फ्लोरवर जाईल तसेच या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम आधीच सुरू झाले आहे. याशिवाय यशराज बॅनरने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळवर रिलीज करणार असल्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा :

  1. Alia bhatt : पापराझीची हरवलेली चप्पल आलिया भट्टने उचलली, सोशल मीडियावर झाली ट्रोल
  2. SPKK Collection Day 15 : 'सत्यप्रेम की कथा'ची बॉक्स ऑफिसवरील पकड ढिल्ली, पाहा १५ व्या दिवसाची कमाई
  3. Samantha wrap Citadel :सामंथाने पूर्ण केली निर्मात्यांना दिलेली वचनं, उपचारांपूर्वी संपवली सर्व शुटिंग्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.