मुंबई : आदिपुरुष, मेगा-बजेट चित्रपट असून या चित्रपटाने वीकेंडच्या पहिल्या सोमवारी संकलनात 75% घट पाहिली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या मते, चित्रपटाचे हिंदी कलेक्शन 8-9 कोटी रुपयांच्या श्रेणीतील होते. तसेच या चित्रपटात राघवच्या भूमिकेत प्रभास, लंकेशच्या भूमिकेत सैफ अली खान आणि जानकीच्या भूमिकेत क्रिती सॅनन आहे. आदिपुरुषला संपूर्ण देशात लक्षणीय घसरण सहन करावी लागत आहे. पहिल्या वीकेंडच्या यशस्वीतेनंतर बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्याची आशा या चित्रपटाची आहे. मीडिया रिपोर्टनुसार ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या चित्रपटाची चार दिवसांची हिंदी आवृतीची एकूण कमाई अंदाजे 113 कोटी रुपये झाली आहे. कलेक्शनच्या अंदाजानुसार, हा चित्रपट आता कार्तिक आर्यनच्या 2022 च्या ब्लॉकबस्टर भूल भुलैया 2 ला मागे टाकण्यासाठी संघर्ष करू शकतो, ज्याची निर्मिती देखील भूषण कुमारच्या टी-सीरीजने केली होती. भूल भुलैया 2 या चित्रपटाने 185 कोटींपेक्षा जास्त कमाई बॉक्स ऑफिसवर केली होती.
-
THE NEGATIVE WORD OF MOUTH HAS COME INTO PLAY…
— taran adarsh (@taran_adarsh) June 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
After a strong opening weekend, #Adipurush COLLAPSES on Monday.#Hindi version. #India biz. pic.twitter.com/HJT4hHT80u
">THE NEGATIVE WORD OF MOUTH HAS COME INTO PLAY…
— taran adarsh (@taran_adarsh) June 19, 2023
After a strong opening weekend, #Adipurush COLLAPSES on Monday.#Hindi version. #India biz. pic.twitter.com/HJT4hHT80uTHE NEGATIVE WORD OF MOUTH HAS COME INTO PLAY…
— taran adarsh (@taran_adarsh) June 19, 2023
After a strong opening weekend, #Adipurush COLLAPSES on Monday.#Hindi version. #India biz. pic.twitter.com/HJT4hHT80u
आदिपुरुष या चित्रपवर सर्वांच्या नजरा : इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, सोमवारी चित्रपटाचे देशांतर्गत (नेट) कलेक्शन फक्त 20 कोटी रुपये होते. आदिपुरुषने देशांतर्गत सर्व भाषांमध्ये 93 कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यामध्ये हिंदीचे नेटिंग अंदाजे 37 कोटी रुपये आहे. पहिल्या वीकेंडमध्ये या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर एकूण 340 कोटींची कमाई केली आहे. आदिपुरुष या चित्रपटाने जगभरात वीकेंडला पठाणच्या रेकॉर्ड तोडला आहे (पहिल्या वीकेंडमध्ये जगभरातील रु. 313 कोटी रुपयांची कमाई केली) शाहरुख खान-स्टारर पठाण या चित्रपटाने जगभरात ₹1,050.3 कोटी रुपयांची (US$130 दशलक्ष) कमाई केली होती. आता हा आकडा आदिपुरुष चित्रपट ओलाडणार का यावर सर्वांच्या नजरा आहे.
आदिपुरुष या चित्रपटावर झाली टीका : दरम्यान चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या मते, नकारात्मक गोष्टीमुळे,वाईट व्हिएफएक्समुळे आणि राष्ट्रीय वादामुळे या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये नक्की फरक पडणार आहे. चित्रपटातील काही वाईट संवादांमुळे प्रेक्षक मनोज मुंतशीर यांना ट्रोल करत आहे. आदिपुरुष या चित्रपटाने सोमवारी यशस्वी पदार्पण केले मात्र शनिवार आणि रविवार कलेक्शनमध्ये फार घट पाहिला मिळाली. प्रेक्षकांनी या चित्रपटावर फार टीका केल्यानंतर आदिपुरुषच्या दिग्दर्शकांनी रविवारी चित्रपटातील काही संवाद बदलण्याचा निर्णय घेतला. आदिपुरुष हा चित्रपट प्रभासचा सलग तिसरा बॉक्स ऑफिस अपयश आहे.
हेही वाचा :