मुंबई : साउथ सुपरस्टार प्रभास आणि क्रिती सेनॉन स्टारर चित्रपट आदिपुरुषला रिलीजच्या पहिल्या दिवसापासून टीकेला सामोरी जावे लागले आहे. या चित्रपटाला फार जास्त विरोध झाला आहे. १६ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि आता ४ जुलै रोजी या चित्रपटाला १९वा दिवस लागला आहे. आदिपुरुष या चित्रपटाचे १८वा दिवसाचे कलेक्शन फार कमी आहे. आदिपुरुष हा चित्रपटगृहात फार जास्त काळ टिकणार नाही. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट खराब व्हीएफएक्स आणि टोपोरी संवादांमुळे सर्व बाजूंनी नाकारला गेला आहे. या चित्रपटाचे संवाद लिहिणारे लेखक मनोज मुंतशीरही आता काही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. आता हा, चित्रपट विभागला गेला आहे. आदिपुरुषने १८व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आणि चित्रपटाचे एकूण कलेक्शन किती झाले हे जाणून घेऊया.
१८ व्या दिवसाची कमाई? : आदिपुरुषने सोमवारी ३ जुलै रोजी म्हणजे रिलीजच्या १८व्या दिवशी फक्त ५० लाख (अंदाजित) कमविले आहे. हे या चित्रपटाचे देशांर्तगत बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे. हा चित्रपट अद्याप देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा गल्ला जमवू शकलेला नाही. या चित्रपटाने भारतात एकूण २८६ कोटींची कमाई केली आहे. आता असे बोलले जात आहे की, हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहे सोडणार आहे. दरम्यान, चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन ४६० कोटींच्या आत आहे.
चित्रपटाला विरोध : या चित्रपटात प्रभास हा राघव, क्रिती सेनॉन ही जानकी, सनी सिंग हा लक्ष्मण, देवदत्त नागे हा बजरंगबली आणि सैफ अली खान हा लंकेशच्या भूमिकेत दिसले आहेत. या कलाकारांचा चित्रपटातील लूक हा लोकांना अजिबात आवडला नाही. चित्रपटाला विरोध करण्याची अनेक कारणे आहेत. हा चित्रपट विरोधामुळे बॉक्स ऑफिसवर कमी कमाई करत आहे. या चित्रपटाला भारतात नाही तर नेपाळमध्ये देखील विरोध झाला होता. या चित्रपटावर नेपाळमध्ये बंदी आणली होती. मात्र काही काळानंतर ही बंदी उठविण्यात आली.
हेही वाचा :