मुंबई : दिग्दर्शक ओम राऊत यांचा 'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रभास स्टारर आदिपुरुष हा चित्रपट रिलीज झाल्यापासून अनेक विवाद आणि टीकेला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवर वाईट परिणाम झाला आहे. 500 कोटींचे मेगा बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 300 कोटींची कमाई करण्यासाठीही संघर्ष करत आहे. मात्र चित्रपटाच्या सध्याच्या कमाईवरून असे वाटत आहे की, आता हा चित्रपट 300 कोटीचा टप्पा पार करू शकणार नाही.
आदिपुरुष कमाई धोक्यात : सध्याला या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कोणतीही चालना मिळत नाही. चित्रपटाच्या वाईट व्हीएफएक्स आणि टपोरी संवादांमुळे 'आदिपुरुष'ला खूप नकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत, ज्याचा परिणाम या चित्रपटाच्या कमाईवरही झाला आहे. हा ट्रेंड असाच सुरू राहिल्यास या आठवड्याच्या अखेरीस हा चित्रपट बहुतांश चित्रपटगृहांमधून काढून टाकला जाऊ शकतो. 'आदिपुरुष' रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात आहे, आणि अजूनही भारतातील रु. 300 कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी धडपडत करत आहे. हा चित्रपट चित्रपटाच्या बजट इतकी कमाई करेल हे फार कठीन दिसत आहे.
17 दिवसात केली इतकी कमाई : मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी, 2 जुलै रोजी या चित्रपटाने भारतात जवळपास 1 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे 17 दिवसांचे कलेक्शन 284-285 कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटात प्रभासने राघवची भूमिका साकारली आहे, तर क्रिती सेनॉनने जानकीची आणि सैफ अली खानने लंकेशची भूमिका केली आहे. तर सनी सिंह लक्ष्मणच्या भूमिकेत आणि देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसला आहे. 'आदिपुरुष' ही वाल्मिकी रामायणावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटावर भारतात प्रेक्षकांनी बंदी घालण्याची मागणी केली होती. याशिवाय या चित्रपटावर नेपाळमध्ये देखील बंदी घालण्यात आली होती. मात्र काही काळानंतर ही बंदी हटविण्यात आली होती. आता देखील या चित्रपटाच्या निर्मात्यांना प्रेक्षक शिव्या देत आहे. या चित्रपटात रामायणातचे स्वरूप बदलविण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षक फार भडकले आहे.
हेही वाचा :