मुंबई - 12th Fail Trailer Out: विक्रांत मॅसी स्टारर '12 फेल'चा ट्रेलर हा प्रदर्शित झाला आहे. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट 27 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये विक्रांत मॅसी हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये विक्रांत हा चंबळमधील एका छोट्या गावातून यूपीएससीची तयारी करण्यासाठी दिल्लीला जातो. '12 फेल' चित्रपटामध्ये विक्रांत मॅसीशिवाय मेधा शंकर, अंशुमन पुष्कर, अनंत विजय जोशी, गीता अग्रवाल हे कलाकारही दिसणार आहेत. या चित्रपटासाठी विक्रांतनं अप्रतिम बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केली आहे. याशिवाय इतर कलाकारांच्या भूमिकाही अतिशय रंजक आहेत.
'12 फेल'ची कहाणी : विकास दिव्यकीर्ती वास्तविक जीवनाप्रमाणेच चित्रपटातही विद्यार्थ्यांना शिकवताना दिसत आहे. चित्रपटाची कहाणी ही चंबळमधील एका मुलाची एक अविश्वसनीय, प्रेरणादायी जीवनावर आधारित आहे, जो 12वी नापास झाला आहे. '12वी फेल'च्या ट्रेलरमध्ये विद्यार्थ्यी परीक्षेसाठी कसा संघर्ष करतात हे दाखविण्यात आले आहे. ट्रेलरचे मुख्य आकर्षण हे दमदार संवाद आहेत. हा चित्रपट यूपीएससी (UPSC) प्रवेश परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर आधारित आहे. ट्रेलरमध्ये यूपीएससी परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक विकास दिव्यकीर्ती सरांची झलकही पाहायला मिळत आहे.
विनोद चोप्रानं शेअर केली पोस्ट : या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन 3 इडियट्सचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी केले आहे. '12 फेल' चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओनं केली आहे. विधू विनोद चोप्रा यांनी चित्रपटाबद्दल सांगताना म्हटलं, 'आजच्या काळात मला एक आशेची गोष्ट सांगायची आहे. कधीही हार न मानण्याची प्रेरणा देणारी कहाणी. '12वी फेल' याबद्दल आहे. त्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं 'जेव्हा मी चित्रपट बनवत होतो, तेव्हा मी हसलो, रडलो, गायलो आणि खूप मजा केली आहे. मला विश्वास आहे की जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल तेव्हा लोकांना त्याच्याशी जोडले'. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नडमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
- Keemti song out: 'मिशन राणीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू'मधील अक्षय कुमार आणि परिणीती चोप्राचा रोमँटिक ट्रॅक झाला रिलीज...
- Shahid Kapoor and Kriti Sanon : शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन स्टारर चित्रपटाची रिलीज डेट आली समोर...
- Bipasha Basu : बिपाशा बसूनं इंस्टाग्राम स्टोरीजवर बूमरँग क्लिप केली शेअर ; पाहा व्हिडिओ...