मुंबई : Shreyas Talpade underwent angioplasty : मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता श्रेयस तळपदेला एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान, छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने अंधेरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. गुरुवारी अभिनेता श्रेयस तळपदे हा 'वेलकम टू जंगल' या चित्रपटाचे शूटिंग करत होता. त्याने काही अॅक्शन सीन आणि या सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण केले मात्र, घरी आल्यानंतर त्याची अचनाक तब्येत बिघडली त्यामुळं त्याला गुरुवारी अंधेरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रात्री रात्री १०च्या सुमारास अँजिओप्लास्टी
दरम्यान, हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस तळपदे याच्यावर गुरुवारी रात्री १० च्या सुमारास अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. आता श्रेयसची तब्येत बरी असून, तो एकदम ठीक आहे. त्याच्यावर अँजिओप्लास्टीची सर्जरी यशस्वीपणे पार पडली आहे. पुढील काही दिवसांत त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती हॉस्पिटलने दिली आहे.
श्रेयसला आली होती चक्कर
गुरुवारी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करुन श्रेयस घरी गेल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत दुखू लागले. यानंतर अचानक चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला. यानंतर आम्ही त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, असं श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदे हिने सांगितले. श्रेयसची तब्येत बिघडली,असे कळताच त्याच्या चाहत्यांनी त्याला बरे वाटावे यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे.
श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेनं हेल्थ अपडेट शेअर केली
श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेनं एक निवेदन 'एक्स'वर पोस्ट केलं आहे. यामध्ये तिनं त्याच्या हेल्थची अपडेटही दिली आहे. तिनं सर्व मित्र आणि मीडियाला विनंती करताना लिहिलंय, ''माझ्या पतीची प्रकृती बिघडल्यानंतर तुम्ही दाखवलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. त्याची तब्येत आता स्थिर आणि बरी आहे. काही दिवसातच त्याला डिस्चार्ज मिळेल हे सांगताना आनंद होतोय.''
दीप्ती तळपदेनं पुढं लिहिलंय, ''या काळात मेडीकल टीमने घेतलेली काळजी आणि वेळेवर दिलेला प्रतिसाद महत्त्वाचा ठरला आहे आणि आम्ही त्यांच्या कौशल्याबद्दल आभारी आहोत. त्याची तब्येत पूर्ववत होईपर्यंत आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा ही नम्र विनंती. तुमचा अतूट पाठिंबा आम्हा दोघांसाठी प्रचंड ताकदीचा स्रोत आहे.'' दीप्ती श्रेयस तळपदेनं शेअर केलेल्या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
हेही वाचा -
1. शुटिंगनंतर श्रेयस तळपदेला उच्च रक्तदाबाचा त्रास, रुग्णालयात उपचार सुरू
2. 'लुट पुट गया' गाण्यावर थिरकला ख्रिस गिल, शाहरुख खाननं केलं त्याच्या कोरिओग्राफीचं कौतुक
3. भारती सिंह, हर्ष लिंबाचिया आणि ढिंचक पूजा 'बिग बॉस 17'च्या वीकेंड का वारमध्ये लावणार हजेरी