ETV Bharat / entertainment

Project K Release Date Out : प्रभासचा बहुचर्चित प्रोजेक्ट के चित्रपटाचा मुहुर्त ठरला, या तारखेला होणार रिलिज - प्रभासने शेअर केली सोशल माध्यमात पोस्ट

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने आपल्या आगामी प्रोजेक्ट के चित्रपटाची रिलिज तारीख आपल्या सोशल माध्यमातील अकाऊंटवर शेअर केली आहे. या चित्रपटात बीग बी अमिताभ बच्चन, सुप्रसिद्ध अभिनेत्री दिपीका पदुकोन यांची प्रमुख भुमिका आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 ला प्रदर्शीत केला जाणार आहे.

Project K Release Date Out
प्रोजेक्ट के चित्रपटाचा मुहुर्त ठरला
author img

By

Published : Feb 18, 2023, 12:29 PM IST

मुंबई - प्रभासचा बहुचर्चित चित्रपट प्रोजेक्ट केच्या चित्रपटाचा मुहुर्त ठरला आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 ला रिलिज होणार आहे. याबाबतची माहिती सुप्रसिद्ध अभिनेता प्रभास याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. त्यामुळे या बहुचर्चित चित्रपटाच्या रिलिजची तारीख ठरल्याने प्रभासचे चाहते आनंदित झाले आहेत.

प्रभासने शेअर केली सोशल माध्यमात पोस्ट : सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता याच्या प्रोजेक्ट के या चित्रपटाच्या रिलिज तारखेवरुन अनेक चर्चा सुरू होत्या. मात्र आता खुद्द प्रभासने या चर्चाला पूर्ण विराम देत चित्रपट कधी रिलिज होणार आहे, त्याबाबतची माहिती दिली आहे. या चित्रपटाचे शुटींग 2023 च्या शेवटपर्यंत समाप्त होणार आहे. त्यानंतर 12 जानेवारीला हा चित्रपट रिलिज होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रभासने आपल्या सोशल माध्यमावरील अकाऊंटवरुन याबाबतची माहिती पोस्ट करत चित्रपट रिलिज होण्याची तारीख जाहीर केली आहे.

दिपीका पदुकोन आणि बीग बीची असेल मुख्य भुमिका : प्रोजेक्ट के हा बहुचर्चित चित्रपट अनेक कारणांनी चांगलाच चर्चेत होता. यात गेल्या काही दिवसापासून याचित्रपटाच्या रिलिजच्या तारखेवरुनही चांगलाच घोळ सुरू होता. मात्र प्रभासने या सगळ्या चर्चेला पूर्ण विराम देत चित्रपटाची रिलिज तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेत्री दिपीका पदुकोण, मेगास्टार अमिताभ बच्चन यांचीही भुमिका आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या रिलिजवर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.

चित्रपटात हॉलिवूडचे अॅक्शन डायरेक्टर दाखवणार जलवा : प्रभासचा हा चित्रपटा अनेक कारणांनी चर्चेत होता. या चित्रपटातील अॅक्शन सीन्ससाठी हॉलिवूडच्या अॅक्शन डायरेक्टरला बोलावण्यात आले आहे. चित्रपटातील अॅक्शन सीन्स हॉलिवूडच्या डायरेक्टरने चित्रित केले आहेत. त्यामुळे या चित्रपटात हॉलिवूडचे अॅक्शन सिन्स पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाची प्रभाससह अमिताभ आणि दिपीकाच्या चाहत्यांनाही प्रतिक्षा लागली आहे.

प्रभास आणि दिपीका पहिल्यांदाच एकत्र : सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने यापुर्वी दोन हिंदी चित्रपटात काम केले आहे. मात्र दिपीका पदुकोनसोबत प्रभासने अद्यापही काम केले नव्हते. त्यामुळे दिपीका आणि प्रभासच्या चाहत्यांना पहिल्यांदाच या दोघांना एकत्र पाहण्याची संधी मिळमार आहे. प्रभासने यापूर्वी पूजा हेगडेसोबत काम केले आहे. मात्र दिपीकासोबत त्याची केमिस्ट्री कशी जमते हे प्रोजेक्ट के या चित्रपटातच दिसणार आहे. प्रोजेक्ट के या चित्रपटात बीग बी अमिताब बच्चन बाहुबली फेम अभिनेता प्रभास आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री दिपीका पदुकोन असे त्रिकुट असल्याची या चित्रपटाच्या रिलिज डेटकडे सगळ्यांनी नजरा लागल्या आहेत.

हेही वाचा - Mischievous stories of Big B : बिग बीचे मिश्कील किस्से, जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या बेल बॉटममध्ये शिरला उंदिर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.