मुंबई : चित्रपट स्टार आणि मल्याळम कलाकार कोल्लम सुधी यांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्रिशूर येथील कैपमंगलम पनांबिकुन येथे पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. ज्या कारमध्ये ते जात होते त्या कारला समोरून धडक बसली आहे. या अपघातात सुधी हे फार गंभीर झाल्याने त्यांना कोडुंगल्लूर एआर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण त्यांना वाचवता आले नाही. या अभिनेता सुधीसोबत बिनू आदिमाली, उल्लास अरुर आणि महेशही हे देखील होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोल्लम सुधी मिनी स्क्रीनच्या माध्यमातूनही प्रेक्षकांना परिचित आहे.
मल्याळी सिनेसृष्टीत शोक पसरला : तसेच त्यांना 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या कंठारी या चित्रपटाद्वारे सुधीने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. त्यांनी कट्टापनायले ऋत्विक रोशन, कुट्टनादन मारप्पा, थिट्टा रप्पई, वकाथिरिवू, एक आंतरराष्ट्रीय स्थानिक कथा, एस्केप, केसु ई वेदिन्ते नाधन, एस्केप, आणि स्वर्गथिले यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. अलीकडेच ते त्यांच्या कुटुंबासह स्टार मॅजिक शोमध्ये आले होते. त्यांच्या निधनाने मल्याळी सिनेसृष्टीत शोक पसरला आहे.
लोकांनी केला आरोप : हा अभिनेता गेल्या काही दिवसापुर्वी चर्चेत आला होता. या अभिनेत्या विरोधात काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप केले होते की, त्यांनी आर्थिक फसवणुक केली आहे. अनेक लोकांचे हे म्हणणे होते की, त्यांनी खूप लोकांकडून पैसे उसने घेतले आणि त्याने ते वेळेवर परत केले नाही. त्यानंतर अशा आरोपांना सुधी यांनी प्रत्युत्तर दिले होते. सुधी यांनी फेसबुक व्हिडिओ शेअर करून उत्तर दिले होते. त्यांनी व्हिडिओत म्हटले होते की, माझा विश्वास आहे की तुम्ही मला ओळखता. माझे नाव कोल्लम सुधी आहे. मल्याळम कलाकार आहे. माझी लॉकडाऊन दरम्यान घरातील परिस्थिती फार वाईट झाली होती. त्यानंतर अनेकांनी मला मदत केली. मी एपिसोड मध्ये याबद्दल सांगितले आहे. माझे काम सुरू झाले की मी सर्वांना पैसे पर करेल' असे त्यांनी त्याच्या व्हिडिओच्या माध्यामातून सांगितले होते.
हेही वाचा :