मुंबई - Actor Kiran mane News : आगामी निवडणुकीच्या धरतीवर आयाराम-गयारामांचे इंनकमिंग आणि आऊटगोंईग जोरात सुरू आहे. मागील महिन्यात शिंदे गटानं ठाकरे गटाला धक्का दिला. राज्यातील विविध भागातील अनेक पदाधिकारी यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता ठाकरे गटात रोखठोक भूमिका घेणारे आणि आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे अभिनेते किरण माने यांनी शिवसेना (ठाकरे गटात) गटात प्रवेश केला आहे. मागील काही दिवसांपासून किरण माने राजकीय क्षेत्रात प्रवेश करणार, अशी चर्चा होती. अखेर शिवबंधन बांधून किरण माने यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली आहे. यावेळी किरण मानेंसह बीडमधील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी सुद्धा ठाकरे गटात प्रवेश केला.
संविधान वाचवण्यासाठी भूमिका : किरण मानेंच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटलं, ''माझ्या अचानक राजकीय प्रवेशामुळं बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल, पण आजच्या घडीला अत्यंत विपरीत परिस्थितीत आहे. वातावरण बिघडलेले असताना आणि संविधान धोक्यात आलेल्यानं संविधान वाचवण्यासाठी मी ही भूमिका घेतली. मी अत्यंत सामान्य माणूस आहे. मी कोणताही हेतू बाळगून राजकारणात आलेलो नाही. जी परिस्थिती सुरु आहे ती बदलण्यासाठी आणि उद्धवजींना साथ देण्यासाठी मी आलो आहे, असं यावेळी किरण मानेनं सांगितलं.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
तुमच्याकडे शब्दांची ताकद : यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, किरण माने मी तुमचे स्वागत करतो. कारण तुम्ही कोणत्याही राजकीय हेतूमुळे आमच्याकडे आलेले नाहीत. तुमच्या निमित्ताने आम्हाला आणखी बळ मिळाले. कारण तुमच्याकडे शब्दांचे भांडार आहे. शब्दांची ताकद आहे जी आमच्याकडे नाही. आणीबाणीच्या काळात पु.ल. देशपांडे, दुर्गा भागवत यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली होती. कलावंतांनी भूमिका घेतली पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हटलं. याशिवाय किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
किरण माने यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिले? रश्मी वहिनींनी तुमचंचं घर आहे, असं सांगून स्वागत केलं. त्यांच्या आदरातिथ्यांना भारावून गेल्याचं किरण ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले. त्यांनी पुढे म्हटले, गेल्या दोन तीन वर्षांत हे कुटूंब अनेक जीवघेण्या आघातांमधनं गेलंय. ते घाव अजूनही ओले आहेत. वेदना होत असणार. तरीही या माऊलीच्या चेहर्यावरचं हास्य जराही मावळलेलं नाही. सगळं दु:ख पचवून चेहरा प्रसन्न ठेवायला जिगरा लागतो. माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं. गेली चार दशकं 'मातोश्री' या वास्तूचं आकर्षण अख्ख्या महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला 'मातोश्री' हा अजिंक्यतारा आहे, हे विरोधकही नाकारणार नाहीत ! मुंबईत भले कितीही उंच टॉवर्स उभे राहोत, 'मातोश्री'पुढे सगळं खुजं आहे. मी मुद्दाम ठरवून प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारधारेचा विषय काढला. त्यावर उद्धवजी इतके सविस्तर बोलले की मी अवाक झालो. त्यांच्या विचारांचा सगळा अर्क उद्धवजींच्या नसानसात आहे, हे जाणवलं. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
- किरण मानेची ओळख : किरण माने हे 'बिग बॉस मराठी 4' च्या सीझनमध्ये खूप आक्रमक खेळले, त्यामुळे ते खूप चर्चेत होते. किरण माने यांनी अनेक मराठी मालिका आणि नाटकात काम केलं आहे.
हेही वाचा :