वाराणसी - प्रसिद्ध चित्रपट अभिनेता कार्तिक आर्यन मंगळवारी धर्म आणि अध्यात्माची नगरी काशीला पोहोचला. येथे त्याने प्रथम बाबा विश्वनाथ मंदिरात पूजा केली आणि नंतर काशीच्या प्रसिद्ध गंगा आरतीला हजेरी लावली. रात्री उशिरा त्याने बोटीतून काशीचे अर्धचंद्राकार अद्भुत दृश्य पाहिले. कार्तिक आर्यनने सांगितले की, 'भूल भुलैया 2' या चित्रपटाच्या यशासाठी त्याने नवस मागितला होता, तो पूर्ण झाल्यानंतर तो येथे भेट देण्यासाठी आला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अभिनेता कार्तिक आर्यनने सांगितले की, मी काशी विश्वनाथ मंदिरात वैयक्तिक आणि चित्रपटासाठी नवस केले होते, त्यासाठी मी येथे आलो आहे. कार्तिक म्हणाला की इथे येऊन तुम्हाला भेटून खूप छान वाटतं. येथील घाट आणि गंगा अतिशय सुंदर आहे.
हेही वाचा - पृथ्वीराजच्या स्पेशल स्क्रीनिंगला उपस्थित राहणार अमित शाह