ETV Bharat / entertainment

Godhra teaser :'अ‍ॅक्सिडेंट ऑर कॉन्स्पिरसी: गोधरा' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित - गोध्रा दंगल

एमके शिवाक्ष दिग्दर्शित 'अ‍ॅक्सिडेंट ऑर कॉन्स्पिरसी: गोधरा' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. गोध्रा दंगलीची पार्श्वभूमी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. एक नजर टाकूया या चित्रपटाच्या टीझरवर .

Godhra teaser
गोधरा टीझर
author img

By

Published : May 30, 2023, 5:29 PM IST

मुंबई : गोध्रा ट्रेन जळीतकांडबद्दल अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. त्यावेळी नेमके झाले काय यावर आता देखील रहस्यच आहे. मात्र या रहस्यवर प्रकाश आता टाकल्या जाणार आहे. एमके शिवाक्ष दिग्दर्शित 'अ‍ॅक्सिडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोधरा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाद्धारे या घटनेच्या मागे काय रहस्य होते ते माहित होणार आहे. मात्र सध्याला या चित्रपटाचा टीझर हा सोमवारी मुंबईतील पंचतारांकित कार्यक्रमात प्रदर्शित झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या संशोधनादरम्यान या चित्रपट निर्मात्यांना आणि संपूर्ण टिमला काही धक्कादायक तथ्ये आढळून आली, जी पुराव्यासह चित्रपटात चांगल्या प्रकारे मांडण्यात आली आहेत. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. तसेच आर्टवर्स स्टुडिओने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहले, 'अंधारात प्रवास, साबरमती एक्स्प्रेसमध्ये पाऊल ठेवा, जिथे विसरलेले आवाज प्रतिध्वनीत आहेत' असे कॅप्शन दिले आहे. इतिहासाच्या अकथित अध्यायांवर प्रकाश टाकताना धैर्य आणि निराशेच्या अकथित कथांचा अनुभव घ्या.'

गोध्रा ट्रेन जळीतकांड : 'अपघात किंवा षड्यंत्र, गोधरा'चा 1 मिनिट 12 सेकंदाचा टीझर आहे. या टीझरमध्ये साबरमती एक्सप्रेसने सुरू होते. यानंतर एक व्यक्ती हातात दगड घेवून दाखवली आहे. तसेच टीझरमध्ये जातीय दंगल दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये आजूबाजूला आग दिसत आहे. रिपोर्टनुसार या दंगलीत 59 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर 1948 ते 2002 पर्यंतचा काळ या व्हिडिओमध्ये दाखविला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

टीझर प्रदर्शित : टीझरनुसार, हा चित्रपट गोध्रा ट्रेन जळीतकांडाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या नानावटी-मेहता आयोगाच्या अहवालातील तथ्य आणि पुराव्यावर आधारित आहे. गोध्रामध्ये घडलेल्या घटनेचे सत्य समोर आणणे हा या चित्रपटाचा उद्देश आहे. रागाच्या भरात काही लोकांनी ट्रेनला आग लावल्याची घटना ही होती की पूर्वनियोजित कट होता? यावर हा चित्रपट प्रकाश टाकणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याने या चित्रपटाच्या टीझरला फार हिटस् मिळाले आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची वाट फार आतुरतेने पाहत आहे.

हेही वाचा : Gulshan Devaiah birthday : गुलशन देवय्याने माजी पत्नी कल्लीरोई झियाफेटासोबत साजरा केला वाढदिवस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.