मुंबई -Ira Nupur Wedding : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची मुलगी आणि जावई यांचा शाही विवाह 10 जानेवारी रोजी म्हणजेच आज होणार आहे. उदयपूरमधील अरावली हिल्समध्ये असलेल्या सुंदर ताज अरावली रिसॉर्टमध्ये आमिर खानच्या मुलीच्या लग्नाची सर्व तयारी झाली आहे. आज संध्याकाळी मराठी रितीरिवाजांनुसार आयरा आणि नुपूर शिखरेचा विवाह होणार आहे. याआधी मंगळवारी या लग्नातील सुंदर संगीत सोहळा पार पाडला आहे, ज्यामध्ये आमिर खाननं जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. सध्या अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात खान कुटुंब आणि शिखरे कुटुंब आनंदी दिसत आहेत.
आज होणार लग्न : आयरा आणि नुपूरच्या लग्नाच्या शेवटच्या दिवशी आज दुपारी 4 वाजता 'व्रत' फंक्शन होणार आहे, ज्यामध्ये वधू-वर लग्न करेल. आज बुधवारी मयूरबागेत विवाह समारंभ होईल. यामध्ये वधू-वर एकमेकांना वचन देतील. यासह विवाह सोहळा पूर्ण होईल. या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी मोठ्या संख्येने पाहुणेही पोहोचले आहेत. आयराच्या लग्नामध्ये आमिर खानचा भाचा इमरान खान देखील उपस्थित आहे. आयरा आणि नुपूरचं लग्न खूप भव्य पद्धतीनं होणार आहे. या जोडप्याला राजस्थानी परंपरा खूप आवडली आहे. आयरा आणि नुपूरच्या लग्नामध्ये राजस्थानी पद्धतीनं पाहुण्याचं स्वागत केलं जाणार आहे.
पांढर्या फुलांनी नववधूप्रमाणे सजवलेले ताज अरावली रिसॉर्ट : स्थानिक कलाकार पारंपरिक राजस्थानी लोकनृत्य सादर करून सोहळ्यात आलेल्या पाहुण्याचं मनोरंजन करणार आहेत. हा शाही विवाह संस्मरणीय बनवण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे तर जगातील विविध देशांतून फुले आणण्यात आली आहेत. या रिसॉर्टला पांढऱ्या फुलांनी सजवण्यात आले आहे. त्यासाठी थायलंड आणि इंडोनेशिया येथून फुले आणली आहेत. या लग्नात पाहुणे राजस्थानी, गुजराती आणि मराठी पदार्थांचा आस्वाद घेत आहेत. हलक्या थंडीच्या दरम्यान, शेकोटीचा आनंद या लग्नातील पाहुणे घेताना दिसत आहे. याशिवाय आयराच्या लग्नातील पाहुण्यांना व्हेज आणि नॉनव्हेज जेवण दिलं जात आहे.
हेही वाचा :