ETV Bharat / entertainment

आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' वादाच्या भोवऱ्यात, आमिर द्वेषींनी केली बहिष्काराची मागणी - Aamir Khan troll

आमिर खान आणि करीना कपूर स्टारर 'लाल सिंग चड्ढा'चा ट्रेलर रविवारी लाँच झाला. व्हिडिओ ऑनलाइन शेअर होताच, इंटरनेट युजर्सनी चित्रपटाच्या मुख्य कलाकारांवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. नेटिझन्सनी आमिर खानचे जुने वाद खोदून काढले आणि चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

लाल सिंग चड्ढा पोस्टर
लाल सिंग चड्ढा
author img

By

Published : May 31, 2022, 11:43 AM IST

मुंबई - आमिर खानचा बहुप्रतीक्षित लाल सिंग चड्ढा हा चित्रपटा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. याचा ट्रेलर रविवारी आयपीएस अंतिम सामन्याच्या वेळी रिलीज करण्यात आला. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र काही जणांनी आमिर खानवर व त्याच्या चित्रपटावर टीका करण्याची संधी शोधली आहे. या चित्रपटावर बहिष्कार करण्याची मागणी हे आमिर खान द्वेषी लोक करीत आहेत. यासाठी त्यांनी आमिर खानचे जुने वाद खोदून काढले आणि चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

आमिर खानच्या ‘भारत असहिष्णु आहे’ या विधानाची आठवण करून देताना एका ट्विटर युजरने लिहिले की, “ज्याला भारतात सुरक्षित वाटत नाही त्याने त्याचे चित्रपट भारतात प्रदर्शितही करू नयेत.'' दुसर्‍या नेटिझनने सांगितले की करीनाची नेपोटिझमवरील कमेंट चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे कारण आहे, “माझ्याकडे लाल सिंग चड्ढा न पाहण्याची दोन कारणे 1. करीना कपूरने आम्हाला चित्रपट न पाहण्यास सांगितले. 2. मी फॉरेस्ट गंप पाहिला आहे. त्याचे आकर्षण नष्ट करू इच्छित नाही. ” एका ट्विटर युजरने ट्रेलरमध्ये आर्मीचा संदर्भ देखील दाखवला आणि लिहिले, “त्याचा पुढचा चित्रपट येत आहे. ज्यात तो आर्मी युनिफॉर्ममध्ये मानसिकदृष्ट्या विकलांग म्हणून काम करत आहे. आर्मीवरही खूप विनोद आहेत. लोक या कचऱ्यावर बहिष्कार टाकतील अशी आशा आहे. गणवेश, बिल्ला वापरणे आणि असे चित्रपट बनवण्याबद्दल त्याला IA कडून मंजुरी कशी मिळाली माहित नाही ??

लाल सिंग चड्ढा पोस्टर
लाल सिंग चड्ढा पोस्टर

अद्वैत चंदन दिग्दर्शित, ‘लाल सिंग चड्ढा’ हे एरिक रॉथ आणि अतुल कुलकर्णी यांनी लिहिले आहे. हा चित्रपट टॉम हँक्सच्या हॉलिवूड ब्लॉकबस्टर ‘फॉरेस्ट गंप’ चे अधिकृत रूपांतर आहे. नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा आहे. शाहरुख खाननेही 'लाल सिंग चड्ढा'मध्ये कॅमिओसाठी शूट केले आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

हेही वाचा - अक्षय कुमारने 'सम्राट पृथ्वीराज'च्या यशासाठी केली काशीत गंगा पूजा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.